Breaking News

नाना पटोले यांची घोषणा, राजभवनाला घेराव घालणार महागाई, जीएसटी, बेरोजगारी व ‘अग्निपथ’विरोधात उद्या शुक्रवारी राजभवनला घेराव घालणार

केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पहात आहे. बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात आहे. महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत म्हणून उद्या शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी राजभवनला घेराव घातला जाणार …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला सूचना वजा आदेश, सध्या निर्णय घेवू नका याचिकेत आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रवेश -पुढील सुनावणी ८ ऑगस्टला होणार

सर्वोच्च न्यायालयात काल अपुरी राहिलेल्या सुनावणी आज घेण्यात आली. एकनाथ शिंदे गटाकडून हरिष साळवे यांनी बाजू मांडताना काही सुधारीत मुद्दे उपस्थित केले. त्यावर उध्दव ठाकरे यांची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी प्रतिवाद केला. मात्र या याचिकेत निवडणूक आयोगानेचे वकिल अरविंद दातार यांनी आज आपली बाजू मांडताना निवडणूक आयोगाच्या कामकाजात सर्वोच्च …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश, अंगावर आले तर शिंगावर घ्या उदय सामंत हल्लाप्रकरणी पोलिस प्रशासनाला निर्देश

काल रात्री उशीरा राज्याचे माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे समर्थक आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काही जणांनी हल्ला करत त्यांना इजा करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आज काही शिवसैनिकांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत यासंदर्भातील चर्चे दरम्यान शिंदे समर्थक आमदारांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे निर्देश …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारने जिल्हा परिषदेतील संख्याही घटविली महाविकास आघाडी सरकारचा निर्णय फिरविला

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आग्रहाखातर जिल्हा परिषदांमधील सदस्य संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना आपली राजकिय ताकद वाढण्यास मदत होणार होती. मात्र महाविकास आघाडी सरकार जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …

Read More »

उध्दव ठाकरेंचा निर्णय फिरवत शिंदे सरकारने महापालिका नगरसेवकांची संख्या घटविली मुंबईत २३६ ऐवजी २२७ नगरसेवक राहणार अन्य महापालिकेतील नगरसेवक संख्या कमी होणार

तत्कालीन उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागाने मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांमधील सदस्य संख्या वाढीचा निर्णय आज शिंदे-फडणवीस सरकारने रद्दबातल ठरवित २०१७ साली झालेल्या निवडणूकांमध्ये असलेल्या जागा इतकीच सदस्य संख्या ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, निष्ठेचे कितीही दुध पाजल तरी औलाद गद्दारच बंडखोरांवर उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

एक गुलाब गेलं. पण दुसरं गुलाब वाघ आले. नागाला कितीही दुध पाजा. तो चावतो म्हणजे चावतोच! त्या सर्वांना निष्ठेचे कितीही दुध पाजलं तरी औलाद गद्दारच निघाल्या अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर सडकून टीका केली. उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जळगाव आणी नाशिक येथील शिवसैनिक उद्धव ठाकरे …

Read More »

प्रभात कोळी ठरला पहिला आशियाई जलतरणपटू अमेरिकेतील ३२ किलोमीटर अंतराच लेक टाहो पोहून केले पार

आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभात कोळीने ३० जुलै रोजी अमेरिकेतील लेक टाहो (३५ किमी) अंतर १२ ता ३७ मी पार करत अशी कामगिरी करणारा आशिया खंडातील प्रथम जलतरणपटू होण्याचा मान मिळविला. त्याचप्रमाणे वर्ल्ड ओपन वॉटर स्वीमिंग असोसिएशनचा कॅलिफोर्नियन ट्रिपल क्राऊन पटकावणारा देखील आशिया खंडातील तो पहीला जलतरणपटू ठरला. कॅलिफोर्नियन ट्रिपल क्राऊन या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय भिवंडी-कल्याण शीळ फाटा रस्त्यासह, वर्धा बॅरेज, लेंडी प्रकल्प यासह अन्यचा समावेश

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. मात्र या याचिकेवर आज कोणताही ठोस निर्णय न्यायालयाने दिला नाही. त्यामुळे दुपारी झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या उपस्थित झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ते खालीलप्रमाणे… भिवंडी कल्याण शीळ …

Read More »

उच्च न्यायालयाने दिला आदेश कॉ. पानसरे प्रकरणाचा तपास एटीएसकडे पानसरे कुटुंबियांनी केली होती याचिका

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी कडून केला जात आहे मात्र तपासातून काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे हा तपास महाराष्ट्र एटीएस कडे सोपविण्यात यावा अशी पानसरे यांच्या कुटुंबियांनी मागणी केली होती. त्यानुसार आज उच्च न्यायालयाने तसे निर्देश दिले. महाराष्ट्र एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. मात्र पानसरे …

Read More »

छगन भुजबळ यांचा इशारा, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही बांठिया आयोगाच्या अहवालातील त्रुटींवर उपाययोजना करा

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी समर्पित बांठिया आयोगाने सादर केलेला ओबीसींचा विश्लेषणात्मक अहवाल (इम्पिरिकल डाटा) आपण सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. त्याआधारे ओबीसींचा राजकीय आरक्षण पूर्ववत झाले मात्र ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नेमलेल्या समर्पित बांठिया आयोगाच्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचे दिसते आहे त्यामुळे या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना कराव्या त्याचप्रमाने सर्वोच्च …

Read More »