Breaking News

नाना पटोले यांचा सवाल, मविआने आरक्षणाची पायाभरणी केली आता दिरंगाई कशासाठी ? ओबीसी आरक्षणासाठी भाजपाप्रणित सरकारने तत्परता दाखवावी

राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून अद्याप ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. ओबीसी आरक्षणाची पायाभरणी महाविकास आघाडी सरकारने केलेली आहे. बांठिया आयोगाचा अहवालही सादर झाला आहे परंतु भाजपाप्रणित सरकारला सुप्रीम कोर्टात योग्य बाजू मांडणे जमलेले दिसत नाही. मविआ सरकारने ओबीसी आरक्षणाची पायाभरणी घालून दिली असताना आता दिरंगाई …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेतील जाचक अटी काढणार-शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन …

Read More »

ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्या संतोष बांगर यांची मुख्यमंत्री शिंदेकडून पुन्हा नियुक्ती हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती कायम

बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन करणाऱ्या आणि बहुमत चाचणीच्या आदल्या दिवशीपर्यत उध्दव ठाकरे सोबत राहिलेल्या संतोष बांगर यांनी रात्रीतून आपली निष्ठा बदलून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. त्यांच्या या दलबदलू भूमिकेच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने संतोष बांगर यांची हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केल्याचे जाहिर केले. त्यानंतर संतोष बांगर यांनी …

Read More »

अनंत गीते यांनी पंतप्रधान मोदींना इशारा देत म्हणाले, उध्दव ठाकरेंनी ते प्रयत्न करू नयेत बंडखोर स्वार्थासाठी गेलेत जनतेच्या प्रश्नासाठी नाही

जवळपास एक महिन्यापासून शिवसेनेतील बंडखोरीवरून निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राजकिय आणि सर्वचस्तरात चर्चेचा विषय झालेला आहे. त्यातच या बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या घटनात्मक पेचावरही न्यायालयाकडून अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे नव्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारही अद्याप अधांतरीच आहे. यापार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात शिवसेनेचे माजी केंद्रिय मंत्री मंत्री अनंत …

Read More »

देवेंद्र फडणवीसांनंतर आता शंकरराव गडाख यांनी दिला बंडखोरांना निष्ठेचा धडा मलाही फोन आला होता पण मी उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहणार

राज्यात एकाबाजूला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला घालविले. त्यानंतर भाजपाच्या मदतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापनाही केली. मात्र सुरुवातीला मुख्यमंत्री पदासाठी नाव चर्चेत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अचानक भाजपा श्रेष्ठींनी उपमुख्यमंत्री पद स्विकारण्याचे आदेश दिल्यानंतर त्याचे पालन करणाऱ्या फडणवीसांनी एकनाथ शिंदे …

Read More »

आता केंद्रीय यंत्रणांकडून थेट आदित्य ठाकरे टार्गेट आरे वाचवा आंदोलनात लहान मुलांचा वापर केला म्हणून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मेट्रो-३ च्या आरेतील कार शेडवरून तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगला होता. त्यानंतर आता शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावित राज्यातील महाविकास आघाडीला घालवित भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आणले. त्यानंतर पुन्हा एकदा आरेतच कारशेड करण्याचे …

Read More »

शिक्षक पदभरतीसाठी स्वप्रमाण पत्र अद्ययावत करण्यासाठी मुदत वाढविली १७ जुलैपर्यंत स्वप्रमाणपत्र अद्ययावत करता येणार

पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी ०२ सप्टेंबर २०२१ रोजी ५६१ खाजगी व्यवस्थापनाच्या २०६२ रिक्त पदासाठी मुलाखतीसह पर्यायांतर्गत ३९०२ पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली होती. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांपैकी ज्या व्यवस्थापनांच्या जाहिरातीमध्ये एसईबीसी प्रवर्गासाठी रिक्त जागा होत्या, तथापि खुल्या प्रवर्गासाठी रिक्त जागा उपलब्ध नव्हत्या अशा सुमारे १९६ व्यवस्थापनांतील सुमारे ७६९ रिक्त पदांसाठी …

Read More »

भाजपा सरकारच्या हुकूमशाहीला काँग्रेस भीक घालत नाही सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस राजकीय सूडभावनेने !: नाना पटोले

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार मनमानी व हुकूमशाहीपद्धतीने काम करत असून विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर करत आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी यांना ईडीने पाठवलेली नोटीस ही राजकीय सूडभावनेने पाठवलेली आहे. भाजपाच्या अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत …

Read More »

भाजपा म्हणते, निवडणुका पुढे ढकला निवडणूक आयोगाकडे केली मागणी

राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून नदी – नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषदा, ४ नगर पंचायती व १५ ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने सोमवारी मुंबईत राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, आगामी निवडणूकीत २७ टक्के उमेदवार ओबीसीचे उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठका

ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतिक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक …

Read More »