जयंत पाटील म्हणाले, आगामी निवडणूकीत २७ टक्के उमेदवार ओबीसीचे उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठका

ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतिक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

ओबीसी आरक्षणाशिवाय येणाऱ्या निवडणूका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. आरक्षणाशिवाय निवडणूका होऊ नये अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे.ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू असे सांगत

ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (मंगळवारी) महत्त्वपूर्ण बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वसाधारण सभा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आदींसह पक्षाचे नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, फ्रंटलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. १२ जुलै रोजी होणाऱ्या या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि एकंदरीत राजकीय परिस्थिती यावर चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान १३ जुलै रोजी राष्ट्रवादी मुंबई विभागीय काँग्रेसचीही बैठक यशवंतराव चव्हाण येथे आयोजित करण्यात आली आहे.

About Editor

Check Also

गिरीश महाजन यांची माहिती, नेपाळमधील पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांसाठी केंद्र सरकारशी संपर्कात आतापर्यंत चार पर्यटकांशी संपर्क, नेपाळमध्ये गेलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्याच्या प्रशासनाला सूचना

नेपाळ-तिबेट परिसरातील भूकंप, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तेथे गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती संकलित करण्यात येत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *