Breaking News

आगामी तीन दिवस “या” जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात

भारतीय हवामान खात्याकडून (IMD) राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे ८ जुलै २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोंकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार ( ६४ मिमी ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात …

Read More »

राज्यात ५० आमदारांचे बंड आणि गॅस मागे ५० रूपयांची दरवाढ काय निष्कर्ष काढायचा? प्रवक्ते महेश तपासे यांचा सवाल

राज्यात एकाबाजूला शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून काही तासांचा अवधी होत नाही तोच आजपासून केंद्र सरकारने गॅसच्या दरात ५० रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने या दरवाढीवरून खोचक सवाल करत निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या सत्ता संघर्षात शिवसेनेतील ४० आमदारांनी तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या १० असे …

Read More »

नाना पटोले यांचा निशाणा, मोदी सरकारचा नवा नारा ‘न खाने दूँगा और न पकाने दूँगा मोदीजी १०५३ रुपयांचा गॅस सिलिंडर किती लोकांना परवडणार ?

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करून सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक झटका दिला आहे. या भाववाढीने गॅस सिलिंडर १०५० रुपये झाला आहे. एवढा महाग गॅस घेणे किती लोकांना परवडणार आहे ? असा सवाल विचारत ‘न खाने दूँगा और न पकाने दूँगा’ हा मोदी सरकारचा …

Read More »

सर्वसामान्यांना महागाईचा चटका, आजपासून घरगुती गॅसच्या दरात ५० रूपयांची वाढ वर्षभरात २१८ रूपयांनी महाग

मागील काही दिवसांमध्ये भारतीय तेल कंपन्यांनी गॅसच्या दरात कपात केल्यानंतर आज पुन्हा एकदा वाढत करत तब्बल गॅसच्या दरात ५० रूपयांची वाढ केली. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना दरवाढीचा चटका बसणार आहे. विशेष म्हणजे ही दरवाढ आजपासूनच लागू करण्यात आली आल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिली. गेल्या एका वर्षात घरगुती सिलेंडरचा दर ८३४.५० …

Read More »

शिवसेनेचे खासदारही आता उध्दव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटाकडे? राष्ट्रपती पदाच्या भाजपा उमेदवार द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरेंना पत्र

राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील तब्बल ४० आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारत भाजपाच्या मदतीने राज्यात सरकारही स्थापन केले. त्यानंतर राज्यात उध्दव ठाकरेंचा गट सोडून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसऱ्याबाजूला संसदेतील अनेक खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राज्यात सुरु झालेली असतानाच …

Read More »

शरद पवार यांनी केलेल्या भाकितावर चंद्रकांत पाटील म्हणाले, जे म्हणायचे असते ते… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा दाखला देत केले वक्तव्य

भाजपा आणि शिंदे गटाने एकत्रित येत राज्यात नवीन सरकार स्थापन केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघात दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यानी त्यांचे स्वागत केले. यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारच्या भवितव्याबाबत केलेल्या भाकितावर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले, …

Read More »

उध्दव ठाकरे यांच्या माईक हिसकाविण्याच्या टीकेवर फडणवीस म्हणाले, काळजी करू नका आम्ही एकमेकांना देणारे, घेणारे नाही

विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काल विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्री बोलत असताना माईक खेचून घेतला. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज निशाणा साधला. या टीकेला प्रत्युत्तर देताना नागपूरात पोहोचलेल्या …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश; रेल्वे बंद झाली तर बसेस रस्त्यावर आणा महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षातून घेतला परिस्थितीचा आढावा

मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. मुंबई शहर उपनगरात गेले २४ तासात सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रेल्वेची २५ अशी ठिकाणे आहेत जिथे पावसामुळे रेल्वे बंद झाल्यानंतर नागरिकांची अडचण होवू नये यासाठी …

Read More »

संजय राऊत यांचा टोला; २०० जागांची भाषा दिल्लीतील नेत्यांची, राज्यातील नव्हे आमदार संतोष बांगर यांच्या शिंदे गटात जाण्यावर केले भाष्य

गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांना परत आणण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यासमोर सातत्याने भूमिका मांडणाऱ्या आमदाराने विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत शिवसेनेला मोठा झटका दिला. यापार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटात गेलेल्या शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला. जे आमदार …

Read More »

ठाण्याच्या १५ वर्षाखालील प्रणयने आशियाई कुस्तीत मिळविले रौप्य पदक महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक तुरा

मागील काही दिवसात शिवसेनेचे बंडखोर नेते तथा ठाणे जिल्ह्याचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी आपल्याच वरिष्ठ नेत्यांना सत्ता संघर्षाच्या लढाईत चितपट करत आपल्या हाती सत्ता राखली. तर दुसऱ्या बाजूला ठाण्याचाच मल्ल असलेल्या प्रणय चौधरी यांने बहारीन येथील आशियाई कुस्ती स्पर्धेत आपल्या अलौकिक कामगिरीने अनेकांचे डोळे दिपवत रौप्य पदक जिंकत महाराष्ट्राच्या मानात …

Read More »