भाजपा आणि महाविकास आघाडी विशेषतः शिवसेनेशी सुरु असलेली राजकिय लढाई फारच हमरी-तुमरीवर आल्याचे दिसत आहे. मुंबईतल्या दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन गुढी पाढव्याच्या दिवशी होत असताना मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या उद्घाटनाचे निमंत्रण नसल्याची माहिती उघडकीस आली असून त्यांच्याऐवजी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना निमंत्रित करण्यात आल्याचे …
Read More »मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाच्या आदला बदलीच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत खळबळ भाजपा नेते सुधीर मुनगंटावीर यांच्या वक्तव्यानंतर राजकिय टीका-टीपण्णीला वेग
राज्यातील महाविकास आघाडीतील ऐक्यतेवरून प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सातत्याने ग्वाही देण्यात येते. मात्र राज्यात मुख्यमंत्री, गृहमंत्री पदांची आदलाबदल करण्याबाबत शिवसेनेतील काही नेत्यांकडून मागणी करण्यात येत असल्याचे वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून ते …
Read More »सहकारी संस्थांच्या सभासदांना दिलासाः १९६० कायद्यातील “ती” तरतूद रद्द महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये सुधारणा अक्रियाशील सदस्याची तरतुद रद्द
राज्यातील अंदाजीत दोन लाख सहकारी संस्थांशी जवळ जवळ पाच कोटी लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंधित असणा-या सभासदांच्या हितार्थ आणि सहकार चळवळीच्या सुरळीत कामकाजासाठी सहकारी संस्थांचे नियंत्रण व संनियंत्रण करणा-या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये सुधारणा करून यामध्ये अक्रियाशील सदस्याची तरतुद रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे असंख्य सहकारी संस्थांच्या सभासदांना दिलासा …
Read More »किरण मुझुमदार शॉ यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने केले उद्योजकांना “हे” आवाहन एकात्मतेसाठी आवाज उठवावा -प्रवक्ते महेश तपासे
कर्नाटकात सध्या हलाल मीट (मटणावरून) राज्यात काही संघटनांनी फतवे काढले असून याविरोधात उद्योग जगतातील बायोकॉन कंपनीच्या प्रमुख किरण मुजुमदार शॉ यांनी आवाज उठवतानाच या गोष्टीमुळे देशातील एकात्मतेला बाधा निर्माण होत असल्याची भीती व्यक्त करत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना सर्वसमावेशक धोरण असावे असे सूचित केले. तशाच पध्दतीने उद्योग जगतातील सर्व लोकांनी एकात्मतेसाठी आवाज …
Read More »सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी तर पाईपद्वारे गॅस प्रति एससीएम ३.५० रुपयाने स्वस्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हॅट कमी केल्यामुळे राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नैसर्गिक वायुवरील करात थेट १०.५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार यासंदर्भातील आदेश जारी करत आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली असून मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात …
Read More »स्वतःच्या डिग्रीचा पत्ता नाही, तेच आता विद्यार्थ्यांना परिक्षेबद्दल मार्गदर्शन करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार?
महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, बेरोजगारीसह देशात ज्वलंत प्रश्न असताना त्यावर लक्ष देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नाही. जनता महागाईने होरपळत आहे, तरुण वर्ग बेरोजगारीने त्रस्त आहे, शेतकरी, कामगारांचे प्रश्न आहेत त्यावर पंतप्रधान बोलत नाहीत. ‘चाय पे चर्चा’, ‘परिक्षा पे चर्चा’ करणारे पंतप्रधान मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार? असा प्रश्न …
Read More »५००० रूपयापर्यंतच्या वैद्यकीय चाचण्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना मोफत, अन्य महत्वाचे मंत्रिमंडळ निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील हे महत्वाचे निर्णय
राज्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी राज्यातील ४० ते ५० वर्ष या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची दोन वर्षातून एकदा तर ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी करण्याचा आणि त्यासाठी ५ हजार रुपये इतकी रक्कम प्रतिपूर्ती म्हणून देण्याचा निर्णय …
Read More »राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक पाडवा भेटः वाहतूक भत्त्यात वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय
नुकतेच केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या महागाई भत्यात ३ टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य सरकारनेही सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेत गुढी पाडव्याची भेट शासकीय कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रवासी वाहतूक भत्यातही वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या …
Read More »राज्य सरकारचे वराती मागून घोडे, हाफकीनमधील कोवॅक्सिन लस उत्पादनाला वेग देणार कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर लस उत्पादनाबाबतचा विचार
साधारणतः वर्षभरापूर्वी मुंबईतील हाफकिन इस्टीट्युटमधून कोविडवरील लसीची निर्मिती करण्याबाबतच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूरी दिली. त्यानंतर कोविड लस निर्माण कऱणाऱ्या कोवॅक्सीन कंपनीसोबत राज्य सरकारने सामंज्यस करारही करण्यात आला. मात्र त्यानंतर कोणतीही हालचाल झाली नाही की केंद्र सरकारकडून निधी दिला गेला ना कोव्हॅक्सीनकडूनही कोणती हालचाल झाली. त्यानंतर सगळंच शांत झालं. …
Read More »बैलगाडा शर्यतींमधले खटले मागे घेणार, पण या अटीनुसारच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय
राज्यात कोरोना काळात निर्बंध असतानाही बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे दाखल झालेले खटले मागे घेण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. निर्बंध असतानाही भाजपाच्या गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. तर मावळ आणि दस्तुरखुद्द गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदारसंघ असलेल्या आंबेगाव येथेही शिवसेनेकडून बैलगाडा शर्यतीचे आयोजन …
Read More »
Marathi e-Batmya