Breaking News

१० वी, १२ वीच्या परिक्षा होणार ऐन उन्हाळ्यात तारीख निश्चित नसली तरी शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील १० वी आणि १२ वी परिक्षा आता घेण्याचा विचार राज्य सरकार करत असून १० वी च्या परिक्षा मे नंतर तर १२ वी परिक्षा १५ एप्रिलनंतर घेण्याचा विचार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. कोरोना लॉकडाऊनमुळे शैक्षणिक कामकाज म्हणावे तसे सुरु झाले नाही. त्यातच ऑनलाईन पध्दतीने …

Read More »

औरंगाबाद नामांतरप्रश्नी अजित पवारांचे मोठे वक्तव्य… तिन्ही नेते बसून तोडगा काढतील

नाशिक : प्रतिनिधी राज्यातील औरंगाबाद शहराचे नामांतर करून संभाजीनगर नाव ठेवण्यावरून शिवसेना नेते आणि काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणवर कलगीतुरा सुरु झाला असतानाच याप्रश्नी आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी शरद पवार, सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री बसून तोडगा काढतील असा विश्वास व्यक्त केला. औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीत विरोधाभास असल्याचे समोर …

Read More »

कोरोना: राज्यात पहिल्यांदाच सर्वात कमी मृतकांची नोंद ३ हजार २८२ नवे बाधित, २ हजार ६४ बरे झाले तर ३५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी जवळपास तब्बल ६ महिन्यानंतर राज्यात ३५ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच मागील काही दिवसांपासून साधारणत: ५० ते १०० या दरम्यान कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद होत होती. मात्र पहिल्यांदाच ५० हून कमी मृतकांची नोंद झाली आहे. ही दिलासा देणारी बाब आहे. आज २,०६४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत …

Read More »

फुले दांम्पत्यांनी सुरू केलेल्या भिडे वाड्यातील शाळेची दुर्दशा: या मंत्र्याने घेतला पुढाकार सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी आली जाग

पुणे : प्रतिनिधी पुरोगामी महाराष्ट्राच्या उभारणीत आणि मुलींच्या शिक्षणाची मुर्हुतमेढ रोवणात महत्वाचे योगदान असलेल्या ज्योतिबा फुले- सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात पहिली मुलींसाठी शाळा सुरु केली. मात्र आता या भिडे वाड्याकडे पुणे महानगरपालिका आणि राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने मोडकळीस आली असल्याने येथील शाळा बंद पडली आहे. अखेर सावित्रीबाईंच्या जयंती दिनी …

Read More »

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनलाही मिळाली परवानगी तज्ञ समितीकडून आज मान्यता

नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोनावरील उपचारासाठी काल सीरम इन्स्टीट्युटच्या कोविशिल्ड या लसीला परवानगी दिल्यानंतर आज भारत बायोटेक-इंडियन मेडिकल रिसर्च इन्स्टीट्युटच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या को व्हॅक्सीनलाही आज केंद्र सरकारच्या तज्ञ समितीने मान्यता दिली. त्यामुळे आपतकालीन परिस्थितीत ही लस वापरता येणार आहे. कोरोनावरील औषधांच्या पडताळणीसाठी सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेनच्या तज्ञ …

Read More »

कोरोना : मुंबईत बाधित ३ लाखाकडे तर राज्यातील मृतक संख्या ५० हजाराच्या जवळ ३ हजार २१८ नवे बाधित, २ हजार ११० बरे झाले तर ५१ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील काही काळात मुंबईत शहरातील सर्वाधिक बाधित आणि मृतकांची संख्या सर्वाधिक आढळून येत होती. मात्र आता बाधित आणि मृतकांची संख्या चांगल्यापैकी नियंत्रणात आली असून गेले काही दिवस ५०० ते ७०० च्या आसपास नवे बाधित आढळून येत आहेत. तर जवळपास १० दिवसांपासून मृतकांची संख्या एकेरी स्वरूपात आढळून येत आहे. …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या या जवळच्या उद्योगपती आणि त्याच्या कंपन्यांना सेबीने केला दंड रिलायन्स आणि मुकेश अंबानीवर पेट्रोल घोटाळ्याप्रकरणी कारवाई

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास उद्योजकांच्या यादीत असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसह अन्य दोन कंपन्यांना आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांना भांडवली बाजार नियामक अर्थात ‘सेबी’ने एकूण ७० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबीने नोव्हेंबर २००७ मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडमध्ये (आरपीएल) आढळलेल्या शेअर घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली. सेबीने …

Read More »

लोककलांचे मर्म जाणून घ्यायचाय..मग या ठिकाणांना भेट द्या संवाद मालिका प्रसारित होणार- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत इथल्या मातीचा सुगंध ल्यालेल्या अस्सल लोककलांचे महत्वाचे योगदान आहे. शेकडो वर्षांची लोकप्रबोधनाची  आणि लोकरंजनाची परंपरा असलेल्या राज्यातल्या लोककलांचा इतिहास, जडणघडण, लोककलांचे पूर्वीचे आणि आजचे स्वरूप यावर प्रकाश टाकणारी ‘लोककला रंग’ ही संवाद मालिका सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या फेसबुक पेज व यू ट्यूब वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती …

Read More »

केंद्रीय मंत्री दानवेंचा व्हिडीओ ट्विटरने ठरविला पोटेंन्शियल सेन्सिटीव्ह विभागाने केलेल्या कामाच्या जाहिरातीचा व्हिडिओ

मुंबई : विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीसह संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसऱ्याबाजूला भाजपा केंद्रीय मंत्र्यांकडून कृषी विभागाशी संबधित असलेल्या विभागांनी काय काय कामे केली याची जाहिरात करण्यात येत आहे. अशाच पध्दतीचा एक व्हिडिओ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या ट्विटर अकॉऊंटवर …

Read More »

कोरोना: बाधितांची संख्या स्थिर तर घरी जाणारे वाढले ३ हजार ५२४ नवे बाधित, ४ हजार २७९ बरे झाले तर ५९ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी काल ३१ डिसेंबर २०२० या वर्ष अखेरच्या दिवशी राज्यात जवळपास समसमान बाधित आणि घरी जाणाऱ्यांची संख्या होती. मात्र आज वर्षाच्या पहिल्या दिवशी ३ हजार ५२४ नवे बाधित आढळून आले आहेत. तर घरी जाणाऱ्यांच्या संख्येत १ हजाराने वाढ ४ हजार २७९ इतके बाधित बरे होवून घरी गेले असल्याने …

Read More »