रत्नागिरी : प्रतिनिधी कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मा कसम’ सर्वांनी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या …
Read More »फडणवीस, दरेकरांचा दौरा पवारांच्या एका बालेकिल्ल्यातून सुरु होवून दुसऱ्यात संपणार दौऱ्याची सुरुवात बारामतीतून तर शेवट साताऱ्यात
मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात भाजपा आणि महाविकास आघाडी विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा विरूध्द शरद पवार विरूध्द भाजपा नेते देवेंद्र फडणवीस असा सामना रंगला पाह्यला मिळत आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील नेते प्रविण दरेकर हे जोडीने जाणार आहे. मात्र या दौऱ्याची सुरुवात …
Read More »मंत्री वडेट्टीवारांनी शेतकऱ्यांना दिले हे आश्वासन वेळप्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू सांगत लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश
नांदेड : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे सर्वशक्तीनिशी उभे आहे. शासन स्तरावर पंचनामे पूर्ण झाले असून आता तीन दिवसांपूर्वी पुन्हा अतिवृष्टी झाली त्याचेही पंचनामे सुरू आहेत. हे पंचनामे युद्धपातळीवर लवकरात लवकर पूर्ण करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला …
Read More »पवार म्हणाले शेतकऱ्यांना, अडचणींवर एकजुटीने मात करु… सरकार तुमचं आहे बांधावर जात अतिवृष्टीग्रस्तांना दिला धीर
तुळजापूर-उस्मानाबाद : प्रतिनिधी हे संकट संपूर्ण शेती अर्थव्यवस्था उध्वस्त करणारं आहे. त्यामुळे तातडीची मदत कशी देता येईल… खरवडून गेलेली जमीन कशी सावरता येईल आणि नुकसानीतून बाहेर पडण्यास मदत कशी होईल ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलो आहोत. या संकटावर… आलेल्या अडचणींवर एकजुटीने मात करु. सध्या दिवस वाईट आहेत… अडचणीचे आहेत. परंतु …
Read More »फडणवीस म्हणतायत, मुंबईत प्रादुर्भाव वाढतोय आणि चाचण्या कमी करताय मुंबईत २ टक्क्यांनी वाढले रूग्ण ,राज्यात प्रतिदिन चाचण्या ९२ हजाराहून ७५ हजारांवर
पाटणा: प्रतिनिधी कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करा, असा सातत्याने आग्रह करीत असताना प्रत्यक्षात मात्र राज्यातील ९२ हजार प्रतिदिन चाचण्यांचे प्रमाण आता ७५ हजार चाचण्या प्रतिदिन असे झाले आहे. मुंबईत सुद्धा संसर्गाचे प्रमाण हे २ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासंदर्भात आणखी एक पत्र माजी …
Read More »कोरोना : सलग ३ ऱ्या दिवशी १३ हजारहून अधिक बरे तर पुन्हा बाधितांमध्ये घट १० हजार २५९ नवे बाधित, १४ हजार २३८ बरे झाले तर २५० मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात सलग तिसऱ्या दिवशी १३ हजाराहून अधिक बाधित रूग्ण बरे झाले असून आज १४ हजार २३८ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १३ लाख ५८ हजार ६०६ वर पोहोचली आहे. तर १० हजार २५९ बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या १५ लाख ८६ हजार ३२१ वर आणि अॅक्टीव्ह …
Read More »ड्रग रँकेटमध्ये जे अडकले त्यांच्यावर कारवाई होणारच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले स्पष्ट
मुंबई : प्रतिनिधी “बॉलीवुडमधल्या काही जणांचा ड्रग रँकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कारवाईसुद्धा झाली पाहिजे. पण या काहीजणांच्या चुकीमुळे संपूर्ण बॉलीवुड ड्रग रँकेटमध्ये अडकले असल्याचे म्हणणे योग्य होणार नाही. काही दोषींमुळे संपूर्ण बॉलीवुडची बदनामी करता येणार नाही. नायक आणि खलनायक यात फरक करावाच लागेल,” …
Read More »दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरु मात्र हे व्यायाम बंद जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायाम शाळा प्रतिनिंधीशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांची चर्चा
मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मकात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त …
Read More »अखेर मुख्यमंत्रीही निघाले अतिवृष्टीग्रस्त भागांच्या दौऱ्यावर : असा राहणार कार्यक्रम मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारा १९ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत सकाळी 09:00 वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारीने …
Read More »यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली. न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणे …
Read More »
Marathi e-Batmya