अभिनेता आदित्य पांचोलीला न्यायालयाचा दिलासा वीस वर्षांपूर्वीच्या मारहाणीचे प्रकऱण

साल २००५ मध्ये पार्किंग वादातून एकाला मारहाण केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या अभिनेता आदित्य पांचोलीची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली. परंतु, चांगल्या वर्तनासाठी सुनावलेली एक वर्षाची शिक्षा माफ करून पांचोलीची सुटका कऱण्याचे आदेशही दिले. त्याचवेळी, तक्रारदाराला भरपाई म्हणून दीड लाख रुपये देण्याचे आदेश दिले.

साधारणतः २० वर्षांपूर्वी घडलेली ही घटना असून आरोपी ७१ वर्षांचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याची कोणतेही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि पार्किंगवरून झालेल्या वादातून अचानक हे कृत्य घडले. तत्कालीन न्यायालयाने या पैलूंचा पुरेसा विचार केला नाही. आरोपीने क्रूर पद्धतीने कृत्य केलेले नाही. म्हणून सुनावण्यात आलेल्या शिक्षेत बदल करावा, असे न्यायालयाने पांचोलीला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स कायद्याअंतर्गत दिलासा देताना नमूद केले.

पंचोलीने अंधेरीतील पार्किंग जागेवरून २१ ऑगस्ट २००५ रोजी प्रतीक पशीन नावाच्या माणसावर हल्ला केल्याचा त्याच्यावर आऱोप होता. वर्सोवा पोलिसांनी पंचोलीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये त्याने पशीनच्या नाकावर मारल्यामुळे कानाचे हाड फ्रॅक्चर झाले होते. २०१६ मध्ये, अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने पंचोलीला भारतीय दंड संहितेअंतर्गत दोषी ठरवले आणि पंचोलीला एक वर्षाची शिक्षा तसेच पीडिताला २०,००० रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. त्या निर्णयाविरोधात पंचोलीने दिंडोशी सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. पीडित आणि त्यांच्या पत्नीच्या जबाबात अनेक विसंगती असून आपल्याला खोट्या आरोपात गुंतवण्यात आल्याचा दावा केला होता. तसेच घटनेवेळी उपस्थित इमारतीच्या चौकीदाराची किंवा इतर सदस्यांची चौकशी केली नसल्याचाही दावा पांचोलीने आपीलात केला होता.

About Editor

Check Also

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरोधात अटक वॉरंट वारंवार न्यायालयात गैरहजर राहिल्याने न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी

कथित द्वेषपूर्ण भाषणाच्या एका प्रकरणात अनेक समन्स बजावूनही वारंवार न्यायालयात हजर न राहिल्याने, कृष्णनगर न्यायालयाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *