प्रकाश राज यांनी कंगना राणावतच्या चित्रपटाची उडवली खिल्ली प्रकाश राज कंगना राणावत यांच्यात या विषयावरून शाब्दिक चकमक

अभिनेत्री कंगना राणावत हीच ‘तेजस’ चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटात कंगना भारतीय हवाई दलाच्या पायलट तेजस गिल यांच्या भूमिकेत दिसते. कंगनाने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. पण प्रेक्षकांनी मात्र ‘तेजस’ चित्रपटाला हवी तेवढी पसंती दिलेली नाहीये तसेच संपूर्ण भारतातील प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे.

बॉक्स ऑफिसवर कंगनाच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १. २५ कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘तेजस’ हा चित्रपट भारतीय हवाई दलाच्या महिला पायलटांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात कंगना सोबत अंशुल चौहान, वरुण मित्रा आणि आशिष विद्यार्थी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ सेनगुप्ता यांनी केले आहे.

तेजस’च्या बॉक्स ऑफिस परफॉर्मन्सवरून असे दिसते की प्रेक्षकांनी या चित्रपटाला त्याच्या विषयापेक्षा जास्त तिच्या निर्मिती आणि दिग्दर्शनासाठी पसंत केले नाही. ‘तेजस’च्या बॉक्स ऑफिस परफॉर्मन्समुळे कंगनाच्या करिअर समोर आव्हान निर्माण झाले आहे. तिच्या मागील काही चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे ‘तेजस’च्या यशावर कंगना रणौतच्या करिअरचे भवितव्य अवलंबून आहे.

‘तेजस’ला बॉक्स ऑफिसवर मिळत असलेल्या मंद प्रतिसादामुळे कंगना रणौतने प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यासाठी विनंती केली आहे. तिने एक व्हिडीओ शेअर करून प्रेक्षकांना ही विनंती केली आहे.,कंगनाच्या या व्हिडीओवर अभिनेते प्रकाश राज यांनी टीका केली आहे. प्रकाश राज यांनी कंगनाचा व्हिडीओ रिट्विट करत तिची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, “भारताला आताच २०१४मध्ये स्वातंत्र्य मिळालं आहे. कृपया प्रतिक्षा करा. तुमच्या चित्रपटाला वेग येईल असा टोला लगावला आहे.

About Marathi E Batmya

Check Also

Ranveer Singh threat case

Ranveer Singh threat case : आरोपीने व्हॉट्सअॅपवर ओळख लपवण्यासाठी व्हीपीएनचा वापर केला

चित्रपटसृष्टीत धमक्यांचा हा सिलसिला सुरूच आहे. अभिनेता रणवीर सिंगला १० फेब्रुवारी रोजी व्हॉट्सअॅपवर एक धमकी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *