काजोल परततेय… चित्रपटाच्या चित्रीकरणाचं पहिलं शेड्युलला सुरूवात

मुंबई : प्रतिनिधी

लग्न झालं की अभिनेत्रींचं करियर संपलं असं एके काळी बोललं जायचं. लग्नानंतर ब्रेक घेऊन काही अभिनेत्री पुनरागमन करायच्या, पण त्या चरित्र भूमिकांमध्ये… परंतु आजच्या काळातील काही अभिनेत्री याला अपवाद आहेत. लग्नानंतर गगनभरारी घेत आजच्या काही अभिनेत्रींनी सिनेरसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवला आहे. यात अभिनेत्री काजोलचे नाव आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या दक्षिणात्य अभिनेता धनुषच्या ‘व्हीआयपी २’ या चित्रपटामध्ये खलनायकी भूमिकेतही लक्षवेधी अभिनय करणारी काजोल लवकरच हिंदी चित्रपटातही दिसणार आहे.

काजोलची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या आगामी हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या पहिल्या शेड्युलला सुरुवात झाली आहे. ‘ईला’ असं तात्पुरतं शीर्षक असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण अंधेरीतील यश राज स्टुडिओत सुरू झालं असून ‘परिणीता’ फेम दिग्दर्शक प्रदीप सरकार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. काजोलवर चित्रीत करण्यात आलेल्या पहिल्या शॅाटवेळी चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. या चित्रपटाची निर्मिती पेन इंडीया लिमिटेडच्या बॅनरखाली केली जात असून, अजय देवगण आणि जयंतीलाल गडा निर्माते आहेत. या चित्रपटाच्या कथानकाबाबत तसंच इतर कलाकारांबाबत सध्या कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.

About Editor

Check Also

अभिनेता धर्मेंद्र मुंबईतील ब्रीच कँडीत दाखलः वैद्यकीय पथकाच्या निरिक्षणाखाली अभिनेत्री हेमा मालिनी यांची सोशल मिडीयातून माहिती

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी, अभिनेते-राजकारणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *