फिल्मीनामा

गोंविदाच्या ‘साजन चले ससुराल’चा सिक्वेल येणार

मुंबई : प्रतिनिधी सध्याचा जमाना सिक्वेल चित्रपटांचा आहे. आज केवळ हिंदीतच नव्हे, तर मराठीतही गाजलेल्या सिनेमांचे सिक्वेल बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या जुन्या चित्रपटांमधील कथानकात पुढे काय घडते हे प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. १२ एप्रिल १९९६ रोजी प्रदर्शित झालेल्या निर्माते मन्सूर अहमद सिद्दीकी यांच्या ‘साजन चले ससुराल’ या …

Read More »

बाहुबलीची सिक्रेट क्रश कोण?

मुंबई: प्रतिनिधी तरुण असो वा तरुणी प्रत्येकाच्या मनात कोणी ना कोणी दडलेलं असतं. मग तो सर्वसामान्य असो, वा एखादा स्टार. मनाच्या एका कोनाड्यात प्रत्येकाचा क्रश दडलेला असतो. रुपेरी पडद्यावर चमचमणाऱ्या ताऱ्यांच्या मनातील क्रश जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. ‘बाहुबली’सारख्या विक्रमी चित्रपटामध्ये शीर्षक भूमिका साकारणाऱ्या प्रभासचं नाव आजवर बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं …

Read More »

कृती शिकतेय गरबा

मुंबई: प्रतिनिधी काही महत्वाकांक्षी कलाकार रुपेरी पडद्यावरील व्यक्तिरेखेत जीव ओतण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कष्ट घ्यायला तयार असतात. कोणी वजन वाढवतं, तर कोणी घटवतं… कोणी आपला लुकच बदलून टाकतं, तर कोणी भूमिकेशी एकरूप होण्यासाठी काहीतरी हटके करतं… नृत्यांमध्ये पारंगत असलेले काही कलाकार एखाद्या भूमिकेला न्याय देण्यासाठी विशिष्ट प्रकारची नृत्य शिकण्यासाठीही विशेष मेहनत …

Read More »

तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी राहणाऱ्यांचा ‘घाट’ अभिनेता उमेश आणि अभिनेत्री मिताली पहिल्यांदाच एकत्र

मुंबई:प्रतिनिधी अभिनेता उमेश जगताप व अभिनेत्री मिताली जगताप यांनी रंगभूमी,  मालिका, रुपेरी पडदा अशा विविध माध्यमातून सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सर्वच माध्यमांवर अधिराज्य गाजवणारे असे कलाकार जेव्हा प्रथमच एकत्र येतात, तेव्हा सर्वांचंच लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. आतापर्यंत मोजक्या पण हटके भूमिका करणारे हे दोन चतुरस्त्र कलाकार …

Read More »

प्रिया-अभयची रहस्यमय ‘गच्ची’

मुंबई : प्रतिनिधी आयुष्यातील सुखदुखाची साक्षीदार ठरलेली ‘गच्ची’ शहरातील प्रत्येक माणसासाठी खास असते. बालपणाच्या गोड आठवणींचा संच दडलेल्या या जागेची सर इतर कोणत्याही ठिकाणाला नाही.  म्हणूनच तर, प्रत्येकांची पर्सनल स्पेस असलेली हि ‘गच्ची’, सिनेमाद्वारे लोकांच्या भेटीला येत आहे. लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्राॅडक्शन्स यांची निर्मिती असलेला …

Read More »

स्वप्निलला पुत्ररत्नाचा लाभ

मुंबई : प्रतिनिधी बालवयातच अभिनयाकडे वळल्यानंतर मोठेपणी ‘दुनियादारी’, ‘चेकमेट’, ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘मितवा’ असे एका पेक्षा एक सुपरडुपर हिट मराठी सिनेमे देणाऱ्या सिनेचाहत्यांचा लाडका अभिनेता असलेल्या स्वप्निल जोशी बाप बनला आहे. स्वप्निलच्या घरी आज एका लहानग्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. २०११ मध्ये स्वप्निल लीना आराध्येसोबत विवाहबंधनात बांधला गेला होता. जवळजवळ …

Read More »

विद्युत जमवाल बनणार जंगली थायलंडमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता निशिकांत कामतच्या ‘फोर्स’ या हिंदी चित्रपटामध्ये नायकाला टोकाची टक्कर देणारा खलनायक साकारत लक्ष वेधून घेणारा अभिनेता विद्युत जामवाल सध्या खलनायकी भूमिकांसोबतच नायक, सहनायकाच्या भूमिका साकारण्यात व्यग्र आहे. ‘कमांडो’ आणि ‘कमांडो २’मध्ये नायक बनलेल्या विद्युतच्या ‘जंगली’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. या …

Read More »

१२ जानेवारीपासून सुरू होणार ‘बारायण’ हटके मनोरंजन कथा

१२ जानेवारीपासून सुरू होणार ‘बारायण’ विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक संदेश न देता पालकांसह संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करणारा ‘बारायण’ हा मराठी चित्रपट येत्या १२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कोणते कलाकार आहेत ? या प्रश्नाचे उत्तर ‘बारायण’ च्या अँथम सॉंग मधून प्रेक्षकांना मिळाले आहे. पोस्टर आणि मोशन पोस्टरमधून …

Read More »

“तेरा मुझसे है पहले का नाता कोई…” ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी देखणा चेहरा, मधुर वाणी, मनमोहक अभिनय आणि सहजसुंदर देहबोलीच्या बळावर पाच दशकांहूनही अधिक काळ सिनेसृष्टीची सेवा करीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर (७९) यांनी आज या जगाचा निरोप घेतला. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांची …

Read More »

आईच्या अश्रूंनी मुलाला दिली अभिनयाची संधी

मुंबई : प्रतिनिधी चित्रपटसृष्टीत काम करण्याची एक संधी मिळवण्यासाठी किती स्ट्रगल करावा लागतो हे आजवर अनेक दिग्गज कलाकारांच्या मुखातून आपण ऐकत आलो आहोत. चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळवण्यासाठी बालकलाकारांमध्येही आज कमालीची स्पर्धा वाढली आहे. आपलंही मूल रुपेरी पडद्यावर दिसावं असं अनेकांना वाटत असतं. त्यासाठी पालक बराच खटाटोपही करतात. ‘घाट’ या आगामी …

Read More »