सोलापूरात रात्रीतील १७ सह दिवसभरात २१ जणांचे निदान संख्या ३६४ वर १५० जण बरे होवून घरी

सोलापूर: प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यापाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून दररोज किमान १० कोरोननाबाधीत आढळून येत आहेत. काल दिवसभरात अवघे दोन रूग्ण आढळून आल्यानंतर रात्रीत १७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर दिवसभरात ४ रूग्णांचे निदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंबरकर यांनी दिली.
सद्यपरिस्थित कोरोनाग्रस्तांची संख्या ३६४ वर पोहोचली असून १५० जण आतापर्यत बरे होवून घरी गेलेले आहेत. तर २४ जणांचा मृत्यू झाला आहे. निदान झालेले रूग्ण हे अशोक चौक २, शुक्रवार पेठ १, जूना कुंभारी नाका २, अलकंटे चौक १, लष्कर २, न्यु पाच्छा पेठ १, कुमठा नाका ४, गीता नगर ३, एकता नगर १, साई बाबा चौक २, तुळशी नगर १, नाथ संकुल सदर बझार १ आदी ठिकाणी दिवसभरात रूग्णांचे निदान झाले आहे.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांची माहिती, रुग्णालयांच्या शुल्क नियंत्रणासह कर्करोग उपचारांसाठी नवीन पॅकेजेस आरोग्य सेवांचे निकष सुधारणार

राज्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य क्षेत्रात विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *