अंजली दमानियांचे पावने दोन लाखाचे घड्याळ सापडले चादरीत अडकले मात्र होता चोरीचा संशय

औरंगाबादः प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सोमवारी काही खाजगी कामानिमित्त शहरात आल्या असतांना त्यांचे पावणे दोन लाख रु. किमतीचे घड्याळ हरवले व पोलिसांत तक्रार करताच सापडले. या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी पाच संशयित ताब्यात घेताच घड्याळ दमानिया थांबलेल्या खोलित चादरीला अडकलेल्या अवस्थेत सापडले.
अंजली दमानिया सोमवारी रात्री ९.३० वा. निराला बाजार येथील हॉटेल पर्ल मधे उतरल्या होत्या.मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास हॉटेल सोडल्यानंतर त्यांच्या हातात घड्याळ नसल्याचे लक्षात आले. लॉगिन्सवॉचया कंपनीचे १ लाख ७५ हजारांचे ते घड्याळ होते. त्यांनी हॉटेल पर्ल याबाबत चौकशी केली असता. त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. म्हणून दमानिया यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार देताच बुधवारी दमानिया उतरलेल्या खोलितच घड्याळ सापडल्याचे पर्ल हॉटेल प्रशासनाने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पुढील तपास एपीआय राहूल सूर्यतळ करत आहेत.

About Editor

Check Also

रुग्णालयाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा पुन्हा एकदा हल्लाबोल दही हंडीच्या दिवशी जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्यावरून पालघरमधील रुग्णालयातील घटना

जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्यावरून पालघरच्या रुग्णालयात रात्री उशिरा शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांचा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *