मुख्यमंत्री शिंदें कडून स्फोट दुर्घटनेवर शोक: मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत

नागपुरातील एका उपकरण निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेतील मृत्यूंबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करून वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.

या कारखान्यात संरक्षणदृष्ट्या महत्वाची उत्पादने निर्माण होत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस व संबंधित सर्व यंत्रणांना मदत व अनुषंगाने निर्देश दिले आहेत. या दुर्दैवी घटनेतील जखमींना वेळेत व दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.

About Editor

Check Also

आयआयटी-मुंबईकडून साहिल वाकोडेच्या आत्महत्येप्रकरणी केलेल्या वक्तव्याची मागितली माफी कोणत्याही संचालकाचा राजीनामा नाही

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईने एका विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या परिस्थितीसंदर्भात पूर्वी केलेल्या पत्रव्यवहाराबद्दल माफी मागितली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *