वरळी कोळीवाड्यातील रहिवाशांना हलविण्यात यश पोद्दार हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात ठेवले

मुंबई: प्रतिनिधी

शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून युध्दपातळीवर प्रयत्न करत असतानाच मुंबईतील ऐन मध्यवर्तीभागातील वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे १० रूग्ण सापडले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाला मोठ्या मेहनतीने यश आले.

वरळी कोळीवड्यात कोरोनाचे १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तसेच या १० रूग्णांच्या संपर्कात आलेल्या १०८ जणांना निरिक्षणाखाली ठेवण्यासाठी विलगीकरण कक्ष रवानगी करण्यात येणार होते. मात्र त्यास यातील अनेकांनी नकार दिला. वास्तविक पाहता या नागरिकांना आज सकाळी स्थलांतरीत करण्यात येणार होते. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे त्यास उशीर होत अखेर दुपारी २ नंतर हलविण्यात यश आले.

महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी काल रात्री १०८ रहिवाशांची यादी तयार केली. यातील काहीजणांना वरळी येथील पोद्दार हॉस्पीटलमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या नागरिकांना घेवून जाण्यासाठी बेस्टच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.

About Editor

Check Also

महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासात समृद्धीची पहाट घडवण्याचा एकनाथ शिंदे यांचा संकल्प ठाण्यातील पारंपरिक नववर्ष स्वागत शोभायात्रेत उपमुख्यमंत्र्यांसह शहरातील प्रमुख नेत्यांचा उत्स्फूर्त सहभाग

“महाराष्ट्रातील प्रत्येक घरावर आनंदाची, प्रगतीची आणि विकासाची गुढी अभिमानाने उभारली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *