उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदल्या कोरोनाग्रस्तांची वाढत्या संख्येमुळे सरकारकडून बदल्या

मुंबई: प्रतिनिधी
मुंबई शहराबरोबर उपनगरातील नवी मुंबई, मीरा भांईदर आणि उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. यापार्श्वभूमीवर या ठिकाणच्या तिन्ही महापालिका आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची नवी मुंबईच्या महापालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. तर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.विजय राठोड यांची मीरा भांईदर महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.मंतदा राजा दयानिधी यांची उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त करण्यात आली.
याशिवाय आयपीएस अधिकारी डॉ.संतोष रस्तोगी यांची नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अतिरिक्त निवासी आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली.

About Editor

Check Also

आयआयटी बॉम्बे मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा, प्रा. सुर्यनारायण डुल्लांना बरखास्त करा: झीनत शबरीन

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आयआयटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *