महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीच्या तयारीचा घेतला आढावा ग्रँड हयात हॉटेलला भेट देऊन केली पाहणी

३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबई मध्ये होणार आहे. महाविकास आघाडी या बैठकीची संयोजक असून आज महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी वाकोला येथील ग्रँड हयात हॉटेलला भेट देऊन पाहणी केली व तयारीचा आढावा घेतला.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष माजी मंत्री वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, शिवसेना खासदार संजय राऊत, खा. अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र वर्मा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, संदीप पांडे उपस्थित होते. या नेत्यांनी ग्रँड हयात हॅाटेलची पाहणी करून तिथल्या व्यवस्थेचा आढावा घेतला तसेच बैठकीच्या तयारी बाबत चर्चा केली.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, महापालिकेतील विकासनिधी वाटपात सत्ताधाऱ्यांची दादागिरी विरोधी पक्षातील काँग्रेसशी दुजाभाव पण समाजवादी पक्ष, MIM व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) नगरसेवकांना भरीव निधी, भाजपाचे या पक्षांशी काय हितसंबंध?

मुंबई महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून विरोधी पक्षांच्या नगरसेवकांवर अन्याय केला जात आहे. विकासनिधी वाटप हे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *