मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा विकास मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत सरकार सकारात्मक

श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करणार आहे. त्यासाठी मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

काळबादेवी येथील मुंबादेवीचे दर्शन घेवून या परिसराची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सदा सरवणकर, माजी मंत्री डॉ.दीपक सावंत, माजी मंत्री राज के पुरोहित व माजी नगरसेवक आकाश पुरोहित, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारासु आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबादेवी प्राचीन मंदिर असून याप्रती सर्वांनाच श्रध्दा, आस्था आणि प्रेम आहे. मुंबादेवी मंदिर परिसरात अनेक भक्तगण भेट देत असतात. श्री काशी विश्वनाथ मंदिर व उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर, तिरूपती देवस्थानांच्या धर्तीवर विकास करण्यात यावा अशी मागणी मुंबईकरांची आहे. या परिसरात अत्यावश्यक असणा-या सोयी सुविधा लक्षात घेवून त्या ठिकाणी दर्शन रांगा, वाहन तळ आणि आवश्यक असणा-या सुविधांच्या विकासाबाबत शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल.

दरम्यान, छत्रपती संभाजी नगर येथे काल रात्री उशीरा झालेल्या राड्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून पोलिसांवर दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

आयआयटी बॉम्बे मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा, प्रा. सुर्यनारायण डुल्लांना बरखास्त करा: झीनत शबरीन

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आयआयटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *