कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील क्रांतिवीर महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्व चटईक्षेत्र वापरुन तिथे पाचशे रुग्णशय्या असलेले स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले होते, त्यानुसार म्हाडाकडे त्याबाबत आवश्यक त्या अधिमूल्याचा भरणा केला असून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. …
Read More »ख्रिस्तियानो रोनाल्डो ठरला… सर्वाधिक गोल करणारा फुटबॉल खेळाडू अरब क्लब चॅम्पियन्स चषक सामन्यात एक गोल करण्याचा विक्रम
रियाधच्या किंग फहद इंटरनॅशनल स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या अरब क्लब चॅम्पियन्स चषक सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने आणखी एक गोल करण्याचा विक्रम प्रस्थापित केला. रोनाल्डोने ७४ व्या मिनिटाला हेडरसह त्याचा १४५ वा गोल केला आणि हेडरसह सर्वाधिक गोल करण्याचा गर्ड म्युलरचा (१४४ गोल) विक्रम मोडला. या यादीत स्पेनचा कार्लोस सँटिल्लाना (१२५ गोल) तिसऱ्या …
Read More »पंतप्रधान मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा किस्सा सांगत दगडूशेठ हलवाई गणपतीची आठवण डॉ दिपक टिळक यांच्या हस्ते टिळक पुरस्कार सोहळा संपन्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज १ ऑगस्ट पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि टिळक स्मारक समितीच्या डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते नरेंद्र मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात लोकमान्य …
Read More »समृद्धी एक्स्प्रेसवेच्या बांधकामादरम्यान पुलाच्या स्लॅबवर क्रेन पडल्याने १६ कामगारांचा मृत्यू ठाणे जिल्ह्यात घडला अपघात
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात मंगळवारी समृद्धी एक्स्प्रेसवेच्या तिसऱ्या टप्प्याच्या बांधकामादरम्यान पुलाच्या स्लॅबवर क्रेन पडल्याने १६ कामगारांचा मृत्यू झाला, तर तीन जखमी झाले. एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “तीन ते पाच लोक अजूनही अडकल्याची भीती असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. ही एक …
Read More »शरद पवार यांनी मारलेल्या थापेची पुनःरावृत्ती नरेंद्र मोदी यांच्याकडून अजित पवार यांच्यासोबत… पुण्यात टिळक पुरस्कार वितरणानंतर आधी शरद पवार यांनी तर नंतर मोदींनी अजित पवार यांना मारली प्रेमाची थाप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार देण्यात आल्याबद्दल शरद पवार यांनी आनंदही व्यक्त केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकमान्य टिळक यांची महती सांगणारं एक भाषण केलं. या भाषणानंतर …
Read More »शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत सुकाणू समिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती
राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाच्या गुणवत्तापूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. विविध अभ्यासक्रम आराखड्यांमध्ये या समिती सदस्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. सुकाणू समिती सदस्यांची पहिली बैठक मंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान …
Read More »सुरक्षा कायद्याबाबत अधिकारी एकतर्फी निर्णय घेणार नाही महासंघाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
अधिकाऱ्यांचे सुरक्षा कवच असलेल्या कायद्यात बदल करावा, अशी मागणी पावसाळी अधिवेशनात करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघाने मागणीला विरोध करत, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी कायद्यात बदल करू नका असे साकडे घातले. दरम्यान, अधिकारी महासंघाच्या प्रतिनिधींना अडथळा ठरणारा कोणताही एकतर्फी निर्णय घेणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …
Read More »संभाजी भिडे यांनी राष्ट्रपुरुषांबदल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करू- महिला मुंबई अध्यक्षा सौ.सुरेखाताई पेडणेकर
मनोहर उर्फ संभाजी भिडे हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून राज्यातील वातावरण बिघडवत असतात. साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल केलेल्या आशा वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महिला अध्यक्षा सौ.सुरेखाताई पेडणेकर यांच्याकडून निषेध करत आंदोलन केले आहे. तसेच संभाजी भिडे यांना तत्काळ राज्य सरकारने अटक …
Read More »पायाभूत सोयीसुविधांच्या अनुदानासाठी धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांना आवाहन १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली
मुंबई उपनगर जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अल्पसंख्याक विभागामार्फत सन २०२३-२४ साठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शासनमान्य शाळांना अर्ज करण्यासाठी १० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. …
Read More »जयपूर-मुंबई एस्क्सप्रेसमध्ये गोळीबारः आरपीएफ उपनिरिक्षकासह ४ जणांचा मृत्यू पोलिस आयुक्त शिसवे म्हणाले, वेगवेगळी वक्तव्ये एकत्र करून अंतिम असेल ते सांगू
जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या १२९५६ जयपूर एक्स्प्रेसच्या बी ५ या डब्यात आज ३१ जुलै सकाळी गोळीबार झाला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याला अटक करण्यात आली आहे. या घटनेत आरपीएफच्या उपनिरिक्षकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी …
Read More »
Marathi e-Batmya