मुंबई

औरंगाबाद – पैठण राष्ट्रीय महामार्गावरील ५१ वटवृक्षांचे पुनर्रोपण

महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग ७५२ ई वरील छत्रपती संभाजी नगर ते पैठण दरम्यानच्या ५१ वटवृक्षांच्या पुनर्रोपणाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी पाहणी केली. औरंगाबाद येथील पैठण येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वटवृक्षांच्या पुनर्रोपणाची पाहणी केल्यानंतर तेथील प्रसारमाध्यमांशी संवाद साधला व याबाबत माहिती दिली. यावेळी पालकमंत्री …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसची टीका, …३०० वर्षाच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला काळीमा भाजपा श्रीकांत शिंदे यांना टार्गेट करून सर्वांना कमळ या चिन्हावर निवडणूक लढवायला भाग पाडणार...

आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज म्हणजे महाराष्ट्राच्या ३०० वर्षाच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी तीव्र नाराजी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. जे सरकार स्वतः ला हिंदूत्ववादी सरकार बोलते त्या सरकारकडून वारकर्‍यांवर लाठीचार्ज होतो हे कितपत योग्य …

Read More »

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त चौबे म्हणतात, लाठीमार नाही किरकोळ झटापट

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आषाढ एकादशी वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने आज रवाना होणार होती. मात्र तत्पूर्वीच आळंदी येथे पालखी प्रस्थानाच्या आधीच वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यावरून काँग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलीच टीकेची झोड उठविली. त्यावरून अखेर पिंपरी-चिंचवडचे पोलिस …

Read More »

ठाण्यातील वादावर मुख्यमंत्री शिंदेंचे जम्मू काश्मीरातून प्रतिक्रिया, गोष्ट फार लहान…

राज्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्र येऊन सत्तास्थापन केली. तसेच आगामी निवडणुका एकत्र लढण्याचेही सुतोवाच केले जात आहेत. अशातच ठाण्यात भाजपा-शिंदे गटात वादाची ठिणगी पडली. एकीकडे भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला मदत न करण्याचा ठराव मंजूर केला, तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदेंनी राजीनाम्याची तयारी दर्शवली. आता या सर्व …

Read More »

माऊलींच्या दिंडीला गालबोट; पोलिसांचा वारकऱ्यांवर लाठीचार्ज काही काळ वातावरण तणावाचे झाले

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार होते. या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मात्र या पालखीला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण पहायला मिळाले. वारकरी प्रस्थानावेळी वारकऱ्यांचा आणि पोलिसांचा शाब्दिक …

Read More »

अमित शाह यांच्या टीकेला संजय राऊत यांचे प्रत्युत्तर,… ये डर अच्छा है नांदेड येथील सभेत उध्दव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सध्या भाजपाकडून देशातील ३०० लोकसभा मतदारसंघात मोदी @ ९ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याच कार्यक्रमातंर्गत गृहमंत्री अमित शाह यांची नांदेड येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले. मात्र या सभेत मोदी सरकारच्या काळात घेतलेल्या कामे सांगण्यापेक्षा शिवसेना ठाकरे गटाचे …

Read More »

सत्तेत बसणाऱ्यांचा राष्ट्रवादीवर…जयंत पाटील यांचे भाजपावर टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचा २४ वा वर्धापन दिन राष्ट्रवादी भवनमध्ये साजरा; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचा झेंडा फडकावून राष्ट्रवादी काँग्रेस परिवारास वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षाच्या २४ …

Read More »

जलवाहतुक आणि पर्यटनासाठी फ्लोटिंग जेट्टी व इतर सुविधा निर्माण करणार

जलवाहतूकीस प्रोत्साहन आणि पर्यटनास अधिक चालना देण्यासाठी मुंबईतील ‘एनसीपीए’ परिसरातील समुद्र किनारी फ्लोटिंग जेट्टी, फ्लोटेल वेटिंग एरिया प्लॅटफॉर्म व इतर अनुषंगिक सुविधा निर्माण करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मेघदूत निवासस्थान येथे फ्लोटेल प्रकल्पाबाबत बैठक झाली. यावेळी आमदार मदन येरावार, बंदरे विकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, …

Read More »

मुंबईतील डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा शिंदे-भाजपा सरकारचा निर्णय भाजपा नेते आ. श्रीकांत भारतीय यांची माहिती

मुंबईमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणा-या डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी गृहनिर्माण विभागाचे अधिकारी व डबेवाले संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती भाजपा नेते आ. श्रीकांत भारतीय यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. …

Read More »

“सकाळचा भोंगा…” धमकीचा फोन आल्यानंतर संजय राऊत यांचे फडणवीसांना पत्र सुनिल राऊत यांना आला होता संजय राऊत यांना धमकी देण्याचा फोन

शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी एका अज्ञाताने फोन कॉलच्या माध्यमातून दिली. “सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा गोळ्या घालू,” अशी धमकी देण्यात आल्याची माहिती सुनील राऊत यांनी दिली. यानंतर संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र …

Read More »