मुंबई

येत्या तीन महिन्यात दहा डायलेसिस मशीन सुरू करणार पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

मालाड सामान्य रुग्णालय येथे मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर व मॉड्युलर प्रसूतीगृहामुळे रुग्णांना निर्जतुक वातावरण उच्च प्रतीची आरोग्य सेवा मिळणार असून, माता मृत्यू तसेच नवजात शिशु मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. तसेच आगामी तीन महिन्यात दहा डायलेसिस मशीन देखील बसवण्यात येणार आहेत अशी माहिती कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई …

Read More »

उद्धव ठाकरे खोचक टीका, भाजपा आणि मिंदे गटाला सध्या एकच प्रश्न पडलाय…. २००७ साली अशीच परिस्थिती होती पण आपण केलेल्या मेहनतीवर पुन्हा विजय मिळविला

मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमीवर सायन येथील काही कार्यकर्त्यांनी मातोश्री येथे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जात आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. त्यावेळी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपा आणि मिंदे गटाने रोज माझ्याकडील निष्क्रीय शिवसैनिकाला प्रत्येक आठवड्याला फोडून …

Read More »

सत्यशोधक ओबीसी परिषदेचे मुंबई अध्यक्ष उल्हास राठोड यांचे निधन ५७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सत्यशोधक ओबीसी परिषदेचे मुंबई अध्यक्ष उल्हास राठोड यांचे आज दुपारी के ई एम इस्पितळात निधन झाले. अवघ्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परीवार असून उद्या शनिवारी सकाळी १० वाजता दादर चैत्यभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सत्यशोधक ओबीसी परिषदेचे संस्थापक …

Read More »

गिरणी कामगारांना ठाणे जिल्ह्यात म्हाडामार्फत घरांसाठी जमीन उपलब्ध करणार गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती

मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबई शहरात, उपनगरात जागा उपलब्ध नसल्याने सवलतीच्या दरात म्हाडामार्फत घरे बांधण्यासाठी ठाणे जिल्हयातील ४३.४५ हेक्टर शासकीय जमिनी विनामूल्य उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. या जमिनीपैकी २१.८८ हेक्टर जमीन म्हाडामार्फत गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यास सुयोग्य आहे, असा अहवाल नुकताच ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाला असल्याची …

Read More »

बाळासाहेब थोरात यांची मागणी, गिरणी कामगारांच्या घराचे प्रश्न सोडवण्याची कालमर्यादा निश्चित करा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची सभागृहात मागणी

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामाच्या निमित्ताने मुंबईत आलेले गिरणी कामगार हे मुंबईचे खरे निर्माते आहे, त्यांच्या हक्काच्या घराचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाने कालमर्यादा निश्चित करावी आणि सकारात्मक रित्या हा प्रश्न सोडवावा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केले. बाळासाहेब थोरात म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळात हा प्रश्न …

Read More »

अजित पवार यांनी राज्यस्तरीय पूरपरिस्थितीचा आढावा घेत दिले हे आदेश विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत आढावा

अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचविणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी नियमाचा बाऊ न करता, वेळ पडली तर प्रसंगी, ‘आऊट ऑफ द वे’ जाऊन काम करावे लागले, तर त्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घ्यावा. जनहिताच्या प्रत्येक कार्यात शासन तुमच्यासोबत आहे. आपत्ती निवारण, पुरग्रस्तांच्या …

Read More »

नाशिक शहरातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणार सुहास कांदे यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर पोलिस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईणकर यांची सहपोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. तसेच सरकारी कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याप्रकरणी असलेल्या कलम ३५३ (अ) तरतुदीचा …

Read More »

डिजीटल माध्यमासाठी केंद्राप्रमाणे महाराष्ट्र शासन धोरण स्वीकारण्याचा विचार करेल मंत्री शंभूराज देसाई यांचे आश्वासन

केंद्र सरकारने डिजीटल माध्यमासाठी काही वेगळे धोरण तयार केले असेल, काही वेगळे निकष ठरवले असतील तर त्याचे अवलोकन केले जाईल आणि त्यानुसार राज्याच्या धोरणात बदल केला जाईल, अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. धीरज लिंगाडे यांनी पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर मंत्री शंभूराजे देसाई उत्तर …

Read More »

मणिपूर प्रश्नी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळ्यासमोर आंदोलन सलग दोन महिने मणिपूर धगधगतंय मात्र सरकार निष्क्रिय !

मणिपूर येथे घडणाऱ्या हिंसाचार विरोधात व केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय परिसरातील गांधी पुतळ्यासमोर मौन व्रत धारण करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, भारतात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती किती …

Read More »

मंत्री अनिल पाटील, दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत बांधण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करा अधिकाऱ्यांच्या बैठकीत मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांचे आदेश

दरडप्रवण भागाच्या अनुषंगाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मंत्रालयात घेतली. दरडप्रवण क्षेत्रात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संरक्षक भिंत बांधण्याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव १० दिवसांत सादर करावेत, असे निर्देश मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे …

Read More »