औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशाकरीता २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, मुंबई विभागातील इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदीप दुर्गे यांनी केले आहे. मुंबई विभागाच्यावतीने मुलुंड आयटीआय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई विभाग सहसंचालक यांच्यावतीने दुर्गे …
Read More »संजय राऊत यांना मध्यरात्री अटक, तर दिवसा कोठडी ईडी न्यायालयाने घरच्या जेवणास आणि रात्री १०.३० नंतर चौकशी करण्यास मनाई
गोरेगांव येथील पत्रावाला चाळ प्रकरणात शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांची काल दिवसभर त्यांच्या घरी आणि संध्याकाळपासून मध्यरात्री पर्यंत ईडी कार्यालयात चौकशी केली. त्यानंतर संजय राऊत यांना मध्यरात्रीनंतर ईडीने अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांना ईडी न्यायालयात हजर करण्यात आले असता अखेर न्यायालयाने संजय राऊत यांनी ४ ऑगस्ट पर्यंत …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात याचिका दाखल १ ऑगस्ट रोजी ठाणे न्यायालयात होणार सुनावणी
७ जुलै रोजी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. त्यादिवशी पदभार स्विकारत असल्याने एकनाथ शिंदे यांनी शासकिय इमारती असलेल्या मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात सत्यनारायणाची पुजा घातली. त्यामुळे कायदेशीर गोष्टींचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच त्यांच्या विरोधात एका सामाजिक कार्यकर्त्याने याचिका दाखल केली. महाराष्ट्र राज्य …
Read More »ठाणे विभागासाठी कळवा येथे बसपोर्ट विकसित करा मुख्यमंत्र्यांचे निर्देश
कळवा येथे राज्य परिवहन (एस. टी.) महामंडळाचे विभागीय कार्यशाळा व विभागीय भांडार आस्थापना कार्यरत आहे. एस. टी. महामंडळाच्या बस गाड्यांचे मोठ्या प्रमाणात दुरुस्ती केली जाते. तसेच विभागीय भांडारामार्फत ठाणे विभागातील सर्व आगारांना दैनंदिन लागणाऱ्या साहित्यांचा पुरवठा केला जातो. येथे कर्मचाऱ्यांसाठी, प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक सुविधा अपुऱ्या पडत आहे. त्यासाठी एस. टी. …
Read More »मुंबई महानगरातील ‘या’ रस्ते प्रकल्पांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करा - मुख्यमंत्री
मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांच्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी या कामांची वर्गवारी करुन कमी, मध्यम मुदतीचे रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. जनतेला तात्काळ दिलासा देण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा: २ वर्षात मुंबई होणार रस्ते खड्डेमुक्त, सिमेंटचे रस्ते सध्या २३६ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु तर ४०० किलोमीटरची कामे प्रस्तावित
मुंबई महानगरात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून होत असलेल्या सुधारीत रस्त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर भरून काढून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या. मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाला …
Read More »मुख्यमंत्री शिंदेचे आदेश; ‘या’ दोन गोष्टींसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा खड्डे बुजविण्याचे काम अहोरात्र सुरु राहणार
मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे जिल्हा आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात आज …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश : ठाण्यातील ‘या’ महानगरपालिकांना अतिरिक्त पाणी द्या दिवा, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, ठाणे जिल्हा व शहर
ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा व्हावा यासाठी भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी ५० दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेच्या कोटय़ातील २० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी कोपरी आणि वागळे इस्टेट परिसर तसेच दिवा परिसरासाठी साडेसहा दशलक्ष लिटर अतिरीक्त पाणी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृहात ठाणे जिल्ह्यातील पाणीप्रश्नांची आढावा …
Read More »एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज, राज्य सरकारने दिली हमी ठाणे कोस्टल रोड, भुयारी मार्ग, शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्पासाठी कर्ज
एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी ६० हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास तसेच शासन हमीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात …
Read More »मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क
हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे १० जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टी तर कोंकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु आहे. मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क असून राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या संपर्कात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दरड …
Read More »
Marathi e-Batmya