काही वर्षांपूर्वी आपण ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ हे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारात असून वर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग पूर्ण होत आहेत. तसेच रस्त्यांचे जाळे चांगल्या प्रकारे उभारले जात असून वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणाऱ्या दोन महत्त्वाच्या लिंक पुलांचे लोकार्पण करण्यात आले …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, बीडीडीकरांना मिळालेली घरे मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ
मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. आजचा चावी वितरण कार्यक्रमाने शासनाच्या या कार्यपद्धतीवर एकप्रकारे मोहर उमटविली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. बीडीडी चाळ वासियांना पुनर्विकासातून साकारलेल्या ५५६ सदनिकांचे वितरण ही मुंबईकरांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. माटुंगा येथील …
Read More »नवाब मलिक यांच्याकडे आता राष्ट्रवादीच्या मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपद अजित पवार आणि सुनिल तटकरे यांनी सोपवली मोठी जबाबदारी...
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेले आणि मुंबई अध्यक्ष राहिलेले नवाब मलिक यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय …
Read More »मुंबईतील कबुतरखान्याचा वाद चिघळला … मराठी आणि जैन समुदायाचे शक्ती प्रदर्शन
दोन दिवसापुर्वी जैन धर्मियांनी दादर येथील कबुतरखाना बंदी संदर्भात आंदोलन केले त्याच्यावर कारवाई नाही. मात्र आज मराठी एकीकरण समितीने आंदोलन करताच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. त्यामुळे आता कबुतरखान्याचा वाद अधिक चिघळला आहे. जैन मुनींच्या शस्त्र उचलण्याच्या वक्तव्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र झाले. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. समितीने कोर्टाच्या निर्णयाचा …
Read More »घरगुती वीज ग्राहकांनी ओलांडला १,००० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा टप्पा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सूर्यघर मोफत वीज योजनेतील यशस्वी कामगिरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने यशस्वी कामगिरी केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेच्या अंतर्गत घरगुती ग्राहकांच्या छतावरील सौर ऊर्जानिर्मिती क्षमतेने एक हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष तथा …
Read More »मुंबई विमानतळावर चेक इन सिस्टीममध्ये बिघाड, विमानांच्या उड्डाणावर परिणाम थर्ड पार्टी डेटा खंडीत एअर इंडियाकडून प्रवाशांसाठी सल्ला जारी
थर्ड-पार्टी डेटा नेटवर्क बिघाडामुळे चेक-इन सिस्टीममध्ये व्यत्यय आल्यानंतर एअर इंडियाने शनिवारी मुंबई विमानतळावर प्रवाशांना संभाव्य विलंबाबद्दल सतर्क करणारा प्रवास सल्ला जारी केला. या व्यत्ययामुळे एअर इंडियासह अनेक विमान कंपन्यांच्या विमान उड्डाणांवर परिणाम झाला. एअर इंडिया एअरलाइनने म्हटले आहे की प्रभावित प्रणाली पुनर्संचयित करण्यात आल्या आहेत. तथापि, काही उड्डाणांना विलंब होत …
Read More »एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवणार रस्त्यावर पाणी साचू नये यासाठीही करणार उपाययोजना
ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावरील गायमुख येथील रस्त्याला पडलेले खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवण्यात येतील, तसेच घोडबंदर रोडवरील खड्डे पडलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत दिले होते. त्यानंतर आज त्यांनी स्वतः गायमुख येथे सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती कामाला भेट देऊन त्यांनी सुरू …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, …कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवा कबुतरे वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील मनाचा पुढाकार
कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, कबूतरखान्याबाबत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात. कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश …
Read More »हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्या विरोधात शिवसेनेचे जोरदार आंदोलन पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधींसह सर्व काँग्रेस नेत्यांनी हिंदूंची माफी मागावी
हिंदू दहशतवाद, सनातन दहशतवाद अशी वक्तव्यं करणाऱ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेकडून आज मुंबई आणि ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंबईतील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयावर शिवसैनिकांनी आणि महिला आघाडीने पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी यांनी हिंदूंची माफी मागावी, या मागणीसाठी ठिय्या केला. या आंदोलनात आमदार मनीषा कायंदे, शिवसेना …
Read More »गणेश मंडळांना मोठा दिलासा: मंडपासाठी खड्डा खणल्यावर आता फक्त २ हजार रुपये कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी खड्डा खणल्यास बृहन्मुंबई महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या १५ हजार रुपये दंडाच्या निर्णयाचा अखेर पुनर्विचार होणार आहे. या मागणीसंदर्भात कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे …
Read More »
Marathi e-Batmya