महावितरणकडून विद्युत सहायकांची परिमंडलनिहाय निवड यादी जाहीर कागदपत्रांची पडताळणी २० ते २२ ऑगस्टला

महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या ५ हजार ३८१ उमेदवारांची व संबंधित परिमंडलांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये २० ते २२ ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे. या उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद परिमंडल कार्यालयांमध्ये मूळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे तसेच अद्ययावत ओळखपत्राच्या मूळ प्रतीसह स्वतः हजर राहणे अनिवार्य आहे.

महावितरणने जाहिरात क्र. ०६/२०२३ अन्वये विद्युत सहायक या पदासाठी २० ते २२ मे दरम्यान ऑनलाइन क्षमता चाचणी घेतली होती. यात निवड झालेल्या उमेदवारांची यादी ३० जुलैला सविस्तर माहिती व सूचनेसह कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर १४ ऑगस्टला निवड यादीतील उमेदवार व त्यांना वर्ग केलेल्या परिमंडलांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

आता येत्या  २० ते २२ ऑगस्ट दरम्यान विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जामधील नोंदी, अर्हता, कागदपत्रे व प्रमाणपत्रांची छाननी व पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये होणार आहे. या तीनही दिवशी संबंधित परिमंडलांमध्ये सकाळी १० वाजता मूळ कागदपत्रांची पडताळणी सुरू होईल. नमूद दिवशी काही कारणास्तव पडताळणी पूर्ण झाली नाहीतर दुसऱ्या दिवशी करण्यात येईल. तथापि, सर्व मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह संबंधित उमेदवारांनी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहणार नाही त्यांची निवड रद्द समजली जाईल व भविष्यात त्यांच्या कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्युत सहायक पदी निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांची पडताळणी केल्यानंतर जे उमेदवार पात्र होतील त्यांच्या नियुक्तीबाबत संबंधित परिमंडलामध्ये पुढील कार्यवाही करण्यात येईल. याबाबतची सर्व माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

About Editor

Check Also

मुंबईतील झोपडपट्टी धारक दर तासाला पैसे खर्च करतात ते प्रवासासाठी नाही तर … आयआयटीच्या अभ्यासात माहिती पुढे

मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या अनेक लोकांसाठी सार्वजनिक वाहतूक स्वस्त वाटू शकते, परंतु कामाच्या ठिकाणी पोहोचणे मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *