नालासोपारा, विक्रोळी रेल्वे ट्रॅकवर पाणी, मुसळधार पावसामुळे लोकल वाहतूक विलंबाने नवी मुंबईतही पावसाची दमदार हजेरी

काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मुंबई शहर आणि उपनगरासह आजही चांगलाच मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील काही भागात पाणी साचल्याचे आणि रेल्वे स्थानकातही पावसाचे पाणी चांगलेच साचल्याचे चित्र पाह्यला मिळाले. विशेषतः नालासोपारा आणि विक्रोळी रेल्वे स्थानकात पावसाचे पाणी साचल्याचे चित्र पाह्यला मिळाले. त्याचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाल्याचे पाह्यला मिळाले. तर नवी मुंबईत आठ तासात ११३ मिलीमीटर पाऊस पडल्याने या भागातील नागरिकांचे जीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले.

हवामान विभागाने आधीच आच चार जुलै रोजी पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. त्यानुसार मुंबई, उपनगर आधी भागात ठाण्यात मध्यरात्रीनंतर पावसाने आपली हजेरी मुसळधार स्वरूपात लावली. पावसाने कधी मुसळधार स्वरूरात तर कधी हलक्या सरीच्या स्वरुपात हजेरी लावली. त्यामुळे खोलगट भागात पावसाचे पाणी साचल्याचे पाह्यला मिळाले.

या सततच्या सरीमुळे अनेक मार्गावर दोन फुटापर्यंत पाणी साचले. त्यामुळे पाणी साचलेल्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना टॅक्सी, रिक्षा वाहने मिळणेही अवघड झाले. पावसाचा जोर वाढल्याने मध्य रेल्वे मार्गावरच्या लोकल वाहतूक सेवेवर परिणाम झाला. दुपारपासून विक्रोळीतील रेल्वे ट्रॅकवर पाणी जमा होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पाणी साचल्याचे पाणी रेल्वेनेही वेग मर्यादाही लागू केली नाही. त्यामुळे या भागातून जाणाऱ्या रेल्वे गाड्या अंत्यत धीम्या गतीने जात होत्या.

तर अनेक लोकल या दादर-घाटकोपर, कुर्ला-विद्याविहार, विक्रोळी, भांडूप-मुलुंड दरम्यान अनेक लोकल अनेक वेळ थांबून राहिल्या. त्यातच लोकलच्या डब्यांमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याचेही दिसून येत होते. मात्र या प्रवासा दरम्यान रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले. तसेच या पावसामुळे काही लांब पल्याच्या गाड्या रद्द करण्याची पाळी मध्य रेल्वेवर आली.

नवी मुंबईत आठ तासात ११३.२० मिलीमिटर पावसाची नोंद

मुंबईसह उपमगर आणि नवी मुंबईत पावसाने चांगलीच हजेरी लावल्याचे दिसून येत होते. नवी मुंबईत शनिवारी सकाळी८.३० ते संध्याकाळी ४.३० या आठ तासाच्या अवधीत ११३.२० मिली मीटर पावसाची नोंद झाली. दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. ठाणे-बेलापूर मार्ग पनवेल-सायन यामार्गावर वाहनांचा वेग मंदावला, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाह्यला मिळाले. त्यामुळे नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला मोठी कसरत करावी लागत असल्याचे पाह्यला मिळाले. अनेक सखल भागात पाणी साचल्याच्या तक्रारी महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाकडे नोंदविण्यात आल्या. तसेच १० झाडे पडल्याच्या तक्रारीही नोंदविण्यात आल्या. त्यामुळे या भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाह्यला मिळत होते.

रात्री उशीराने काही काळ पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र मुंबई शहर-उपनगरात आणि नवी मुंबईत झाल्याचे पाह्यला मिळाले. परंतु काही वेळानंतर मुसळधार पावसाने पुन्हा हजेरी लावली.

About Editor

Check Also

मुंबईत पोलिसाची विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या पुढ्या खिशात ठेवून अडकविण्याची धमकी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस आणि आपकडून टीका

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी मुंबईत झालेल्या नाट्यमय विद्यार्थी आंदोलनानंतर आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *