सरकारी जाहीरातींमुळे आचार संहितेचा भंग होतोय जाब विचारून गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. १० मार्च रोजी पासून लागू झालेली असतानाही राज्यभरातील एसटी बसेस, बस थांबे, पेट्रोल पंपासहित इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सरकारी प्रचाराच्या जाहिराती अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने सरकारला जाब विचारून संबधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे केली.
यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांना पत्र लिहून ही बाब आयोगाच्या निदर्शनास आणून दिली.

About Editor

Check Also

राज ठाकरे यांचा सवाल, याला जबाबदार कोण? निवडणूक आयोगाकडून मतचोरी आणि भाजपाला मदत होईल अशा कामकाजावरून केला सवाल

इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राच्या कालच्या मुख्य पानावरच्या या मथळ्याखालच्या ’14 times in 10 months, two Election …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *