चितळेवर कळव्यात गुन्हा दाखल झाल्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, इतकी विकृत असेल… स्त्रीत्वाचा फायदा घेत काहीही लिहू शकतो असे वाटत असेल तर ते चुकीचे

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आजारपणाबद्दल आणि त्यांच्या राजकिय व्यक्तीमत्वाबाबत अत्यत खालच्या पातळीवरील टीका करणारी कविता दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक प्रोफाईल शेअर कर स्वत:ची बौध्दीक दिवाळखोरी दाखवून देत नवा वाद ओढावून घेतला. तिच्या विरोधात कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टीका केली असून स्त्रीत्वाचा फायदा घेत काहीही लिहू शकतो असे वाटत असेल तर ते चुकीचे असल्याचे सांगत ती इतकी विकृत असेल असेल याची कल्पनाही करवत नाही अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली.

केतकी चितळे इतकी विकृत असेल याची कल्पनाही करवत नाही. आपल्या स्त्रीत्वाचा फायदा घेत काहीही लिहू शकतो असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. तिने काय लिहिले आहे ते लोकांना वाचावे आणि तेच तुमच्या आजोबांबद्दल किंवा वडिलांबद्दल लिहिले तर काय वाटेल याचा विचार करा. ज्या माणसाचे कर्करोगाचे ऑपरेशन झाले आहे त्यांच्यासोबत राजकीय दृष्ट्या लढा. त्याला आम्ही उत्तर देतो. तुम्ही त्यांचा चेहरा कसा झालाय यावर बोलणार असाल तर उद्या आमच्या कार्यकर्त्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या तर तुम्हाला ओरडता येणार नसल्याचा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी केतकी चितळेला दिला.

माझ्यासारखा माणूस जो शरद पवारांसोबत ३५ वर्षे आहे तो हे कसे काय सहन करेल. आज महाराष्ट्रात १००-२०० पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्ते गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहेत. शेवटी ते राष्ट्रवादीच्या कुटुंबाचे बाप आहेत. त्याच्यांबद्दल इतके घाण वाचून पहिल्यांदा डोळ्यात अश्रू येतात असेही ते म्हणाले.

तुम्हाला यात वाटत असेल काही होणार तर तसे नाही. यामध्ये पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते. पण हे सर्व आमचं सरकार गांभीर्याने घेत नाही नाहीतर यामध्ये ज्यांनी रिट्विट केले आहे ते सुद्धा गुन्हेगार ठरतात. त्यामुळे माझं पद गेलं तरी बेहत्तर पण शरद पवारांवरील टीका आम्ही सहन करणार नाही. त्यांना वाटत असेल की मंत्रीपदासाठी हे घाबरतील पण तसे नाही. बापापुढे कोणी नाही. त्यामुळे असं करु नका माझी एवढीच हात जोडून विनंती आहे असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला.

About Editor

Check Also

उदय भानू चिब यांची मागणी, IIT मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्रा. सुर्यनारायण दुल्लांना तत्काळ अटक करा राहुल गांधी यांचा साहिलच्या पालकांशी फोनवरून संवाद, काँग्रेस साहिलच्या कुटुंबियांसोबत, साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच राहिल.

आयआयटी IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याला संस्थेतील प्राध्यापकांनी जातीवाचक व मानसिक छळ केल्यामुळेच आत्महत्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *