काँग्रेस दाखल करणार किरीट सोमय्यांच्या विरोधात एक रूपयाची याचिका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची माहिती

नागपूर: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्या विरोधात गरळ ओकत असतात. बिनबुडाचे आरोप करुन नाहक बदनामी करत असतात. सोमय्या यांच्या बेताल व बिनबुडाच्या वक्तव्याप्रकरणी आता त्यांच्या विरोधात कोर्टात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली.
किरीट सोमय्या यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवर बोलताना वसुलीच्या पैशातील ४० टक्के शिवसेना, ४० टक्के राष्ट्रवादी काँग्रेस व २० टक्के काँग्रेसला मिळतो असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली. सोमय्या यांच्या या बेताल, बिनबुडाच्या आरोपाविरोधात आता त्यांच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल करणार असून दोन कवडीचा दावा दाखल करता येत नाही म्हणून १ रुपयाचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करत आहेत. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात त्यांची असंबंध बडबड सुरु असते. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून या बेताल बडबडण्याला चाप बसला पाहिजे म्हणून दिडदमडीच्या सोमय्यांची जेवढी लायकी आहे तेवढ्याच किमतीचा म्हणजे एक रुपयाचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

सुप्रिया सुळे यांची माहिती, केंद्राच्या अहवालानुसार पुणे क्राईमच्या बाबतीत देशात ५ व्या क्रमांकाचे शहर पुणे पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सगळी काँग्रेस तुम्ही घेणार असं होतं का?

केंद्रीय गृहविभागाच्या अहवालानुसार पुणे शहर क्राईमच्या बाबतीत राज्यात पहिले तर देशात पाचवे शहर बनलय आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *