अखेर किरीट सोमय्यांचा त्याच पायरीवर सत्कार, पण आधी पालिका आयुक्तांची भेट खासदार बापट म्हणाले, मला अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचाय

मराठी ई-बातम्या टीम

काही दिवसांपूर्वी जम्बो कोविड घोटाळ्याची तक्रार पुणे महापालिका आयुक्तांकडे करण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्यांना शिवसैनिकांच्या घोषणाबाजीला सामोरे जात असताना सोमय्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव गराड्यातून बाहेर काढताना पायऱ्यांवर सोमय्या पडले. शिवसेनेच्या या कृत्तीला प्रतित्तयुर म्हणून आज अखेर किरीट सोमय्या यांचा पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहिर सत्कार करण्यात आला.

परंतु तत्पूर्वी किरीट सोमय्या यांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे जावून जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट दिलेल्या कंपनीच्या विरोधातील रितसर तक्रार केली. त्यानंतर इमारतीच्या पायऱ्यांवर सत्कार करण्यात आला.

किरीट सोमय्या यांना त्या दिवशी पालिका आयुक्तांकडे जावून तक्रार दाखल करता आली नसल्याने आज सत्काराच्या निमित्ताने सोमय्यांनी महापालिकेत जावून तक्रार दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. सोमय्या यांनी त्या घटनेनंतर शिवसेनेचा धसका घेतल्याने त्यांनी आज भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेवून जावून पालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेल्याचे शिवसैनिकांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान सोमय्यांच्या या सत्कारानंतर आयोजित कार्यक्रमात भाजपाचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मला अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचा आहे. यावेळी त्यांना समोर ठेवलेला चहा घेण्याबाबात सांगण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले.

चहाचा तर घोट घ्यायचा आहे, पण अनेकांच्या गळ्याचा देखील घोट घ्यायचा आहे. किरीट सोमय्या अनेकांची वाट लावण्याचं काम करत आहे. गेली अनेक वर्ष किरीट सोमय्या आणि मी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुका, आंदोलनं, कार्यक्रमाला जातो. त्यावेळी ज्या पद्धतीने त्यांची तलवार चालते. काँग्रेसवाले गोमुत्र घेऊन गेलेत. तपासायला पाहिजे. कदाचित वाईन असेल. त्याचा वास इथपर्यंत येतोय. मी फक्त वासावर आहे, पित नाही कधी असे सांगायालाही ते विसरले नाहीत.

तर किरीट सोमय्यांनी सांगितले की, संजय राऊत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बेनामी कंपन्यावर कारवाई झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशाराही दिला.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *