नाना पटोलेंनी सांगितले काँग्रेस मंत्री गैरहजर राहण्याचे कारण: केली स्मारकाची मागणी मंगेशकर कुटुंबियांची भेट घेवून केले सांत्वन

मराठी ई-बातम्या टीम

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेला आणि अंत्ययात्रेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचा एकही मंत्री उपस्थित राहीला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. यापार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे सर्वजण कोरोना बाधित आहेत. त्यामुळे ते काल लता दिदींच्या अंत्यदर्शनाच्या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत. तर माझ्या बहिणीच्या सासु सुद्धा वारल्यामुळे मी तिकडे होतो असा खुलासा करत आमचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप तिथे होते असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सध्या तालुक्यास्तरावर काँग्रेस कमिटीच्या लोकांना आम्ही सूचना दिल्यात कालच सर्व ठिकाणी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करण्याचा काम करण्यात आल्याचे स्पष्ट करत अस्लम शेख सुद्धा मुंबईबाहेर होते, वर्षा गायकवाड मुंबईबाहेर होत्या शनिवार- रविवार मुळे अनेकांची दौरे होते. अनेकांना कनेक्टिव्हिटी नव्हती, त्यामुळे आम्ही पोहोचू शकलो नसल्याचा खुलासा करत लतादीदी या काँग्रेस परिवारातल्याच होत्या त्यांचे योगदान मोठे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रवक्ते अतुल लोंढे हे मंगेशकर कुटुंबियांच्या घरी जावून त्यांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

ब़ॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याला सध्या करण्यात येत असलेल्या ट्रोलबाबत विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येकाला संविधानाप्रमाणे स्वातंत्र्य आहे की आपल्या धर्मानुसार वागावे. काहीजण मुद्दामून धर्मावर टीका करून मोठे करण्याचे काम करत आहेत. काही जणांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे की दुसऱ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालायचा अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

लता दिदींचे स्मारक झालेच पाहिजे

लतादीदी यांचा स्मारक हे शिवाजी पार्कलाच व्हावं आणि चांगल्या दर्जाचं व्हावं, आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावं अशी मागणी करत देशातून आणि जगातून येणाऱ्या लोकांना लतादीदींच्या स्मारकाला गेल्यानंतर लतादीदींचा गोड आवाज कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पिढीला स्मरणात राहील अशा दर्जाचे स्मारक शिवाजी पार्क मध्ये व्हावं ही काँग्रेसची भूमिका असल्याचे मत व्यक्त करत भाजपा आमदार राम कदम यांनी केलेल्या मागणीला त्यांनी दुजोरा दिला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘वारी’वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे निर्मित ‘पंढरपूर वारी - इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ माहितीपटाला आंतरराष्ट्रीय बहुमान

पंढरपूर आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत निर्मिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *