डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भव्य तिरंगा व अखंड भीमज्योत उभारणार

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

कुपरेज-ओव्हल मैदान (कुलाबा) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य राष्ट्रीय तिरंगा ध्वज व अखंड भीमज्योत उभारणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

कुपरेज-ओव्हल मैदान (कुलाबा) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य राष्ट्रीय तिरंगा ध्वज व अखंड भीमज्योत उभारण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री.बडोले बोलत होते. यावेळी आमदार भाई गिरकर, राज पुरोहित, सामाजिक न्याय व मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

याविषयी श्री. बडोले म्हणाले, कुपरेज-ओव्हल मैदानावरील भव्य राष्ट्रीय तिरंगा ध्वज व अखंड भीमज्योत उभारण्याबाबतचा सर्व खर्च सामाजिक न्याय विभाग करेल व राष्ट्रीय तिरंगा ध्वज व भीमज्योतीची देखभाल मुंबई महानगरपालिका करेल. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधितांना यावेळी देण्यात आल्या.

About Editor

Check Also

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्रातून ४३२ अर्ज सादर

महाराष्ट्र शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *