विधीमंडळाचे लेखानुदान अधिवेशन एक दिवसाने वाढविले

विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या मागणीला यश

मुंबई : प्रतिनिधी

आगामी लोकसभेच्या निवडणूकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लागण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारकडून यंदाचे लेखानुदान विधिमंडळात सादर करण्यासाठी अवघ्या चार दिवसाचे अधिवेशन बोलावले. परंतु राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने त्यावर सरकारकडून करण्यात येत असलेल्या कामाची माहिती करून घेता यावी याकरिता लेखानुदान अधिवेशनाचे कामकाज एका दिवसाने वाढविण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. त्यानुसार विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज एक दिवसाने वाढविण्याचा निर्णय सांसदीय कामकाज सल्लागार समितीने घेतला.

लेखानुदान अधिवेशन घेण्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद आणि विधानसभेतील सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांच्या सल्लागार समितीची बैठक आज मंगळवारी घेण्यात आली. याबैठकीला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शिवसेनेचे गटनेते, सांसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी अधिवेशनाचे कामकाज २५ फेब्रुवारीला सुरु होवून २९ फेब्रुवारी २०१९ रोजी संपणार होते. परंतु विखे-पाटील यांनी दुष्काळावर विधिमंडळात चर्चा होण्याची आवश्यकता असल्याची बाब समितीच्या निदर्शनास आणून देत एक दिवसाने विधिमंडळाचे कामकाज वाढविण्याची मागणी केली. त्यावर समितीने विधिमंडळाचे कामकाज एकदिवसाने वाढविण्याचा निर्णय घेतला.

About Editor

Check Also

एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग

एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *