राज्यातील तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन दिवाळी पूर्वीच करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

राज्यातील तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन वेळेत देणे आवश्यक आहे. परंतू काही महाविद्यालय त्यांचे मानधन वेळेत देत नाहीत अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन दिवाळीपूर्वी २१ ऑक्टोबर २०२२ पर्यत त्यांच्या थकीत मानधन देण्यात यावे. याबाबत संबंधित उच्च व तंत्र शिक्षण विभागीय सह संचालक यांनी आढावा घेऊन अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी मिळेल याकडे लक्ष द्यावे, असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग

एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *