मलिकांच्या मुलीचा आरोप, तो हायड्रोजन बॉम्ब फोडू नये म्हणूनच भाजपाकडून अटक मुलगी निलोफर मलिक आणि अमोल मिटकरी यांच्याकडून आरोप

साधारणत: डिसेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी एका भाषणात भाजपाच्या कोणत्या नेत्यांचे अंडरवर्ल्डमधील कोणाशी संबध आहेत याची माहिती असलेली सीडीचा हायड्रोजन बॉम्ब आपल्याकडे असून तो अद्याप फोडलेला नाही. तो तसाच आहे. मी तो बॉम्ब विधानसभेत फोडणार असल्याचा इशारा दिला होता. तो बॉम्ब फोडला जावून नये म्हणूनच भाजपाने ईडी मार्फत मलिक यांना अटक करविली असल्याचा आरोप नवाब मलिक यांची मुलगी निरोफर मलिक-खान हीने ट्विट करत केला आहे.

त्यांनी सत्य बोलू नये म्हणूनच ही कारवाई केलेली आहे. या कृत्यातून भाजपा मलिक यांना रोखत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हा आरोप करताना निरोफर मलिक यांनी डिसेंबर महिन्यात जाहिर भाषणात दिलेल्या इशाऱ्याचा व्हिडिओही त्यांनी यावेळी शेअर केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनीही याच अनुषंगाने भाजपावर आरोप करत केवळ आणि केवळ मलिकांनी त्या गोष्टीचा भंडाफोड करू नये म्हणूनच आणि त्यांना त्या गोष्टी बाहेर आणण्यापासून रोखण्यासाठी त्यांना जाणीवपूर्वक अटक करण्यात आरोप केला.

तसेच भाजपा नेत्यांना त्या सीडीची भीतीच वाटली असल्याने ईडीमार्फत अटक करायला लावली असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी निलोफर मलिक-खान आणि आमदार अमोल मिटकरी यांना या मुद्यावरून आव्हान देत म्हणाले की, मलिक आता नाहीत जर तुमच्याकडे ती सीडी असेल तर तुम्ही ती खुशाल जाहीर करावी असे आव्हान देत भाजपाच्या एकाही नेत्याचे अंडरवर्ल्डशी संबध नसल्याचे स्पष्ट केले.

२ डिसेंबर २०२१ चे नवाब मलिक यांचे भाषण होत आणि तेव्हापासून भाजप मध्ये अस्वस्थता होती, भाजपाच्या कोणत्या नेत्यांचे दाऊदशी संबध आहेत हे मी महाराष्ट्राच्या समोर आणणार, असे मलिक म्हणाले होते. त्यामुळे कटकारस्थान रचून मलिक यांना अडकवण्यात आले. ते हायड्रोजन बॉम्ब टाकणार होते. नवाब मलिकांकडे सर्व पुरावे आहेत, असा दावा आता अमोल मिटकरी यांनी केला.

मुस्लिमांना खूश करण्यासाठी नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यात येत नसल्याचा आरोप भाजपा नेत्यांकडून होतोय. चंद्रकांत पाटील यांनी दुपारीच याबाबत बोलताना म्हणाले की,  हा जो अट्टहास आहे, ही लोकशाहीची थट्टा आहे. मग अनिल देशमुख आणि राठोड यांचा राजीनामा का घेतला? असा सवालही त्यांनी केला आहे. विशिष्ठ समाजाला खूश करण्यासाठी राजीनामा होत नाही, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

 

About Editor

Check Also

एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग

एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *