राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची उद्या मुंबईत बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्या २७ मार्च रोजी सकाळी ११ वा, केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत लोकसभा उमेदवारांच्या संदर्भात चर्चा होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडणार आहेत. या बैठकीला पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत तसेच पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, पीसी चाको, अनिल देशमुख, श्री जितेंद्र आव्हाड या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीमध्ये उभे करण्यात येणाऱ्या उमेदवारांबाबत चर्चा, निर्णय व निवडणूक संदर्भात इतर समित्यांचे गठन होणार अशी माहिती महेश तपासे यांनी दिली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘वारी’वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे निर्मित ‘पंढरपूर वारी - इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ माहितीपटाला आंतरराष्ट्रीय बहुमान

पंढरपूर आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत निर्मिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *