राजकारण

नाना पटोले यांची मागणी; अनाचार्य भोसले, दवे, नितेश राणेंचीच एसआयटी चौकशी करा त्र्यंबकेश्वरमध्ये दंगल घडवण्याचा भाजपाचा कुटिल डाव गावकऱ्यांनी उधळून लावला

महाराष्ट्रात जातीय तणाव वाढवून दंगली घडवण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्ष व त्यांच्याशी संलग्न संघटना करत असल्याचे मागील काही दिवसापासून दिसत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याच्या प्रकरणाला भाजपाशी संबंधित लोकांनी जाणीवपूर्वक वादाचा रंग देऊन वातावरण बिघडवण्याचे काम केले आहे. त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली असून …

Read More »

बैलगाडा शर्यतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

बैलगाडा शर्यतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनापासून स्वागत केले आहे. “हा विजय सर्वस्वी बैलगाडा शर्यतप्रेमींसह शेतकऱ्यांचा आहे, १२ वर्षांपासून सुरू असलेला लढा सर्वांच्या प्रयत्नामुळे जिंकता आल्याचे समाधान आहे”, असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त …

Read More »

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षपूर्ती महोत्सवात… भाजपा कार्यकर्त्यांना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आमचा आदर्श आहेत. रयतेसाठी कल्याणकारी राजा म्हणून महाराजांची ख्याती आहे; म्हणून राजमाता जिजाऊ यांनी महाराजांना राज्याभिषेकाचा सांगितलेला अर्थ आजच्या पिढीपर्यंत प्रबोधन, कीर्तन आणि विविध उपक्रमातून पोहोचविण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा शिवसेना सरकारने केला. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे …

Read More »

सोनिया गांधी यांची शिष्टाई आणि मुख्यमंत्री पदाचा पेच सुटलाः शनिवारी शपथविधी सिध्दरामय्या मुख्यमंत्री तर डि.के.शिवकुमार होणार उपमुख्यमंत्री

मागील तीन दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण सिद्धरामय्या की डि.के.शिवकुमार बसणार यावरून चर्चेच्या फेऱ्या सातत्याने होऊनही पेच सुटत नव्हता. डि.के.शिवकुमार आणि सिध्दरामय्या याच्यात माघार घ्यायलाही कोणी तयार नव्हत. या दोघांमध्ये समन्वय साधण्याचे काम काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांनी केले. पण डि.के.शिवकुमार आपला मुख्यमंत्री पदावरील दावा सोडविण्यास तयार …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा दावा, राष्ट्रवादीत अजून दोन बॉम्ब फुटायचेत, त्यानंतर… शिवसेनेकडून दक्षिण मध्य मुंबईची जागा वंचितला देण्याची तयारी

नुकत्याच महाविकास आघाडीच्या बैठकीत मविआतील घटक पक्षांच्या मित्र पक्षांनाही आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे ठाकरे गटासोबत असलेल्या वंचित बहुजन आघाडीला मविआत स्थान मिळणार असल्याची शक्यता वक्त करण्यात येत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात खळबळजनक दावा केला. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, …

Read More »

कार्यक्रम भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा अन अदानीची वीज गेली मोदी सरकारच्या पावला वर पाऊल ठेवत शिंदे सरकारची कामगिरी!:नड्डा

आगामी मुंबई महापालिका निवडणूका आणि मध्यावधी निवडणूकांची शक्यता गृहीत धरून सध्या सर्वच राजकिय पक्षांकडून तयारी सुरु केली. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असतानाही दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा याच्या ऐन कार्यक्रमात कांदीवलीतील अदानी पॉवरच्या वीज यंत्रणेकडून वीज गेली. त्यामुळे अखेर कार्यकर्त्यांच्या मोबाईल टॉर्चमध्ये कार्यक्रम पार …

Read More »

संजय राऊत यांचे टीकास्त्र, हिंदुत्वाच्या नावावर टोळ्या निर्माण करून… राज्यातील सलोखा पध्दतशीर बिघडविण्याचा खेळ सुरु

आमच्याइतके कडवट हिंदुत्ववादी देशात कुणी नसतील आम्ही ढोंगी नाही सांगतानाच त्र्यंबकेश्वर हा आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय असून तिथे कधीही अशा घटना घडल्याचं माझ्या स्मरणात नाही. परवाच्या घटनेत कुणीही मंदिरात घुसल्याची माझ्याकडे माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचं पत्र त्यांना द्यायला लावलं आणि त्यांनीच आज त्र्यंबकेश्वरला आंदोलन सुरू …

Read More »

जयंत पाटील यांनी सांगितला निर्णय, वाद निर्माण होण्याची शक्यता त्यामुळे…. राष्ट्रवादी काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीनंतर दिली माहिती

महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक गावात ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा कार्यक्रम घेण्यात येतो. यामध्ये गावप्रश्नापासून ते देशस्तरावरील प्रश्नांचा उहापोह होतो. त्यामुळे आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या कार्यक्रमावर अधिक भर द्यायचा असा निर्णय करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. जयंत पाटील म्हणाले, बुथ …

Read More »

राहुल नार्वेकर यांची स्पष्टोक्ती, …दोन महिन्यात निर्णय कसा घेणार? भरत गोगावले यांची नियुक्ती पक्षानेच केली होती

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील शिवसेना फुटीवर आणि सत्तासंघर्ष प्रकरणी अंतिम निकाल देताना अनेक महत्वाचे निर्णय दिले. त्यामध्ये शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची प्रतोद पदी करण्यात आलेली नियुक्ती अवैध ठरविली. तर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विहित कालावधीत घ्यावा असे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले. यानंतर ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या दाव्यावर विधानसभा …

Read More »

जयंत पाटील यांची सूचना,… खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत नवाब मलिकांनी समीर वानखेडेवर केलेले आरोप सीबीआय कारवाईनंतर खरे ठरत आहेत...

महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब असून या घटनेच्या खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. महाराष्ट्रात जातीय दंगली गैरसमजातून अथवा जाणीवपूर्वक होत असतील तर याचा छडा लावायला हवा. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत याची …

Read More »