मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून तिथे ते रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. तसेच तिथे ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील भेट घेणार आहेत. त्याआधी शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते आज ठाण्यावरून विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना झाले. या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः …
Read More »नाना पटोले यांची माहिती; राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या महाराष्ट्रात सभा…आमचंही हिंदूत्व पण ते आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदूत्व आम्ही मानतो
कर्नाटक विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर काँग्रेसकडून उमेदवारी वाटपाची दुसरी यादी नुकतीच जाहिर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आगामी काळात कर्नाटकात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि नेत्या प्रियंका गांधी यांच्या सभा होणार आहेत. आता कर्नाटकासोबतच सहा सभा महाराष्ट्रात घेण्यात येणार असून यासंदर्भात १० एप्रिलला ठाण्यात प्रदेश काँग्रेसची …
Read More »सुषमा अंधारेंच्या ट्विटवर मोहित कंबोज यांचे प्रत्युत्तर, सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोन्ही बहिणी एक बहिण महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी बहिण सिनेमात
ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत आहेत. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे आणि मविआच्या इतर कार्यकर्ते – पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात मोर्चा काढला. यावेळी भाषणात बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतलं. त्यावरून आता भाजपा …
Read More »अर्थमंत्री सीतारामण यांची टीका, ….आरोप करून तोंडावर पडतात तरीही अदानीच्या २० हजार कोटींच्या गुंतवणूकीवरून पहिल्यांदाच अर्थमंत्र्यांचे प्रत्युत्तर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर तिखट शब्दांत निर्मला सीतारमण यांनी टीका केली आहे. अदानी प्रकरणावरून राहुल गांधी सध्या आक्रमक झाले आहेत. अदानींच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी कुठून आले? असा प्रश्न विचारत आहेत. यावर आता निर्मला सीतारमण यांनी प्रत्युत्तर दिले. …
Read More »भाजपा पार्टी स्थापना दिनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन, कार्यकर्त्यांनो हा संकल्प करा… लोकसभेच्या ४८ तर विधानसभेच्या २०० हून अधिक जागा जिंकण्याचा तयारी करा
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीसह सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकण्याचा आणि विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा संकल्प करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केले. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. भाजपाचे ज्येष्ठ …
Read More »नायब तहसीलदार संघटनेची घोषणा, बेमुदत संप तात्पुरता मागे पण मे नंतर पुन्हा.. मे महिन्यापर्यंत ग्रेड-पे सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा
राजपत्रित अधिकारी पदाचा ग्रेड-पे देण्याचा प्रस्ताव सरकारने मान्य केल्याने राज्यातील नायब तहसीलदारांनी आपला बेमुदत संप आज स्थगित केल्याची घोषणा केली. मे महिन्यापर्यंत नायब तहसीलदारांना त्यांच्या मागणीनुसार ग्रेड-पे मिळाला नाही तर पुन्हा संप केला जाईल असा इशाराही महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने दिला आहे. नायब तहसीलदारांना १९९८ मध्ये राजपत्रित …
Read More »संजय राऊत यांचा फडणवीसांवर निशाणा,…तर ते खरे गृहमंत्री शोभतील काडतूस असाल तर भ्रष्टाचाऱ्यांवर वापर करा
काडतूस असतील तर त्यांनी त्याचा वापर भ्रष्टाचाऱ्यांच्या करावा. तर ते खरे गृहमंत्री शोभतील. पण हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर बसवून विरोधकांवर काडतूस फेकून मारत आहेत. पण ती भिजलेली काडतूस आहेत. त्यामुळे काही होत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून सातत्याने गैरवापर …
Read More »महसूल मंत्री विखे-पाटील म्हणाले, नायब तहसिलदारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा नायब तहसिलदारांना संप मागे घेण्याचे महसूल मंत्र्यांचे आवाहन
राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार (राजपत्रित वर्ग २) यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. आज मंत्रालयात नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग -2 यांचे ग्रेड पे …
Read More »पुण्यातील उद्धव ठाकरे सेना, राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश हर्षवर्धन पाटील आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश
उद्धव ठाकरे सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक रामशेठ गावडे पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पलांडे, नीरा बाजार समितीचे संचालक भानुकाका जगताप यांच्यासह पुणे जिल्ह्यातील उबाठा सेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय …
Read More »कार्यकर्त्यांच्या वन्समोअरवर आदित्य ठाकरे म्हणाले, असे लोक ‘ओनली वन्स’ होतात… गद्दार गँगला मदत करणाऱ्या चिलट्यांचे जेलभरो करणार
शिवसेना (ठाकरे गट) युवा सेनेच्या नेत्या रोशनी शिंदे यांना सोमवारी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीने आज ठाण्यात जनक्षोभ मोर्चा काढण्यात आला. तीनही पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात एकत्र जमले आणि त्यांनी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी …
Read More »
Marathi e-Batmya