राजकारण

अजित पवार यांचा आरोप, निर्णय न घेतलेल्या जाहिराती दाखवून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक… रोहयो आणि संजय गांधी निराधार योजनेवर केलेल्या जाहिरातीची अजित पवारांनी केली पोलखोल

सध्या जाहिरातबाजी आपल्या राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत आहे. ‘शासन आपल्या दारी’ शासनाने जो उपक्रम सुरू केला आहे, त्यात काही ठिकाणी खुर्च्या रिकाम्या दिसत आहे. त्याचे फोटो येत आहेत. मंत्र्यांचा तोल जातो आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जाहिराती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात असताना अतिशय चुकीच्या व खोट्या आणि …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीचा खरा शत्रू भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण प्रवासात ज्या वेळी ओबीसींना न्याय देण्याचा विषय आला त्या प्रत्येक वेळी त्यांच्या नेत्यांनी विरोधात काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस व त्या पक्षाचे नेते हेच खरे ओबीसींचे शत्रू आहेत, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे बोलताना केला. भाजपाने कधीही ओबीसीवर अन्याय केला नाही, असेही …

Read More »

आमदार प्रणिती शिंदे यांचा घणाघात, पंतप्रधान मोदींचे कवच…गुन्हेगार खासदार बृजभूषणला महिला कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी महिला काँग्रेसचे मुंबईत आंदोलन

कुस्ती फेडरशेनचे अध्यक्ष व भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे दाखल करण्यात आले असताना मोदी सरकार मात्र बृजभूषण शरण यांना वाचवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कवच या महिला कुस्तीपटुंसाठी नसून स्वतःच्या पक्षाच्या गुन्हेगार खासदार बृजभूषणला वाचवण्यासाठी …

Read More »

नाना पटोले यांची टीका, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक… सहा-सहा जिल्ह्यांना एक पालकमंत्री; प्रशासन ठप्प, जनता वाऱ्यावर

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या इशाऱ्यावरच काम करतात. दिल्लीकरांनी सांगितल्याशिवाय हे एकही निर्णय घेऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक असून त्यांचा एक पाय कायम दिल्लीतच असतो, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री …

Read More »

भरत गोगावले यांनी केले स्पष्ट, सूत्र सांगणार आणि आम्ही आशेवर…विचारतोच मुख्यमंत्र्यांना राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून भरत गोगावले यांनी भूमिका

राज्यात महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येऊन एक वर्ष झालं, तरी अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सांगितलं जात आहे. परंतु त्याबद्दल अद्याप निश्चित माहिती कोणीही दिलेली नाही. त्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत नसल्याच्या मुद्यावरून ठाकरे …

Read More »

नरेंद्र मोदी दिवसातून पाचवेळा ड्रेस बदलतातः काँग्रेसने केला तो व्हिडीओ शेअर ओडिशातील अपघाताच्या दिवशी पाच वेळा ड्रेस बदलल्याचा केला आरोप

देशात संयुक्त पुरोगामी आघाडीचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनीही तीन ते चार वेळा कपडे बदलल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठविली गेली. तसेच कपडे बदलामुळे त्यांना घरीही जावे लागले. मात्र या घटनेशी काहीस साधर्म्य घडणारी गोष्ट नुकतीच काँग्रेसकडून भाजपाचे सर्वेसर्वा तथा …

Read More »

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा असाही सुसंस्कृतपणा, तो शरद पवार…अक्कल शिकवणार ओबीसी नेत्यांच्या सहभागावरून टीका करताना केला उल्लेख

शिवसेनेला फोडून राज्यात भाजपाप्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात आणल्यापासून राज्याच्या राजकारणातील वरचष्मा दाखविण्यासाठी कधी भाजपाच्या नेत्यांकडून तर शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून सातत्याने एकमेकांवर शेरेबाजी करताना अश्लाघ्य भाषेचा वापर करताना दिसून येत आहे. तर बरेच नेते शिवराळ भाषा वापरू लागले असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपा नेते आणि सांस्कृतिक …

Read More »

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील कुस्तीगीर परिषदेत ब्रिजभूषणबाबत कोणती घेतली भूमिका? महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत महिला पैलवानांच्या बाजूने घेतली बाजू

सध्या संपूर्ण देशभरात राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे माजी अध्यक्ष ब्रिजभुषण सिंह सरण यांच्या विरोधात महिला कुस्तीगीरांकडून दिल्ली येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाची चर्चा होत आहे. तसेच याप्रकरणी भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महिला नेत्या कोणीच बोलायला तयार नाहीत. तसेच काही अपवाद वगळता इतर नामवंत खेळाडू, राजकीय पक्षाचे नेतेही प्रतिक्रिया देण्यास उत्सुक …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती,… पण लव्ह जिहादबाबत सजग बेपत्ता महिलांच्या तक्रारीवर आम्ही संवेदनशील

भाजपा नेत्यांकडून वारंवार लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला जातो. तसेच लव्ह जिहादविरोधातील कायद्याची मागणीही होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील बेपत्ता महिलांची वाढती संख्या आणि लव्ह जिहादबाबत विचारणा केली असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यावर कोणताही आक्षेप नसावा, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं. ते शनिवारी ३ जून रोजी …

Read More »

ओडिशा रेल्वे अपघाताचे कारण संयुक्त चौकशीत आले पुढे सिग्नल यंत्रणेतील बिघाड आणि लोको पायलटची चूक कारणीभूत

ओडिशामध्ये घडलेल्या भीषण अपघातात आतापर्यंत २६१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर, ९०० हून अधिक प्रवासी जखमी आहेत. याप्रकरणी जगभरातून हळहळ व्यक्त केली जातेय. गेल्या दोन दशकतील हा सर्वाधिक भीषण अपघात असल्याचंही म्हटलं जातंय. या सर्व पार्श्वभूमीवर हा अपघात नेमका कसा घडला याबाबत सर्वांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. …

Read More »