पंतप्रधान मोदीनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.

१६ जानेवारीपासून देशभरात कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, सैन्यदल यातील लोकांना लसीकरण केले जाणार आहे. परंतु या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात शंका आहे. त्यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घेतली तर जनतेच्या मनातील भीती निघून जाईल असे ते म्हणाले.

 

About Editor

Check Also

मनोज जरांगेंच्या मोर्चावरून एकनाथ शिंदे म्हणाले की, कुणीही राजकिय भूमिका घेऊ नये गणेश भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय घेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *