बाबा सिद्धीकींवर हल्ला करणाऱ्या आणखी एकास अटक, दोघांना कोठडी अमरावतीच्या लोणकर आणि अल्पवयीन असल्याचे सांगणारा वयात आलेला

वांद्रेतील महाराष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार करून ठार मारणाऱ्या आरोपीला आज पोलिसांनी अमरावतीतून अटक केली असून अटक कऱण्यात आलेल्या आरोपीचे नाव लोणकर असल्याचे समजते. तर यापूर्वीच अटक करण्यात आलेल्या गुरनैल सिंग आणि धर्मराज कश्यप यांच्यापैकी धर्मराज कश्यप हा अल्पवयीन असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाने धर्मराजचे वय तपासण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. त्याच्या हाडाची चाचणी केली असता धर्मराज हा अल्पवयीन नसल्याचे आढळून आले. आता त्यालाही पोलिस कोठडी सुणावनीत आली आहे.

बाबा सिद्धीकी यांना ठार मारण्यासाठी गोळीबार करणाऱ्या गुरनैल सिंग आणि धर्मराज कश्यप यास न्यायालयाने २१ ऑक्टोंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे. त्याबरोबरच बिष्णोई गँगशी संबधित असलेल्या प्रविण लोणकर यासही अमरावतीतून आज पोलिसांनी अटक केली असून त्याच्या भाऊ शुभम लोणकर असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोघेही भाऊ बाबा सिद्धीकीच्या खुन कटात सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे.

शनिवारी रात्री गोळीबाराच्या घटनेनंतर शुबू लोणकर महाराष्ट्र या नावाच्या फेसबुक वॉलवर एक पोस्ट करण्यात आली होती. त्यात गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी स्विकारण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी शुबु लोणकर याच्या फेसबुक पेजचा मागोवा घेतला असता तो अकोला जिल्ह्यातील अकोट येथील शुभम रामेश्वर लोणकर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यादृष्टीने पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *