प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती, ‘ट्रान्सजेंडर संरक्षण सुधारणा विधेयक २०२६’ला विरोध प्रस्तावित सुधारणांच्या तरतूदींवर वंचित बहुजन आघाडीच्या हरकती

‘ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, २०१९’ मध्ये केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या सुधारणांना वंचित बहुजन आघाडीने (VBA) कडाडून विरोध दर्शवला आहे. हे सुधारणा विधेयक फेटाळत असल्याचे स्पष्ट करत, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावर लवकरच सविस्तर विश्लेषण प्रसिद्ध करणार असल्याचे जाहीर केले आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात अधिकृत सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत माहिती देताना सांगितले की, ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) सुधारणा विधेयक, २०२६ मधील तरतुदींवर पक्षाच्या गंभीर हरकती आहेत. या हरकती नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सध्या एक अधिकृत निवेदन (Statement) तयार करत असून, लवकरच या विधेयकाचे सर्वांगीण विश्लेषण जनतेसमोर मांडले जाईल.

या विधेयकामुळे ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांवर गदा येण्याची शक्यता असल्याचे संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत. या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सविस्तर विश्लेषणाकडे राजकीय वर्तुळासह सामाजिक कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित वसतिगृहांची संकल्पना जिल्हाधिकाऱ्यांनी १३ ऑक्टोबरपर्यंत सोयीस्कर जागांचे प्रस्ताव पाठवावेत

आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, मराठा तसेच सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहांऐवजी भविष्यात एकाच ठिकाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *