२ ऑक्टोबर हा महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री या भारताच्या थोर सुपुत्रांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस आहे.गांधी जयंती शांततेच्या मार्गाने प्रत्येक कुटुंब स्वतंत्र रहावे श्वास घ्यावा, दुर्दैवी हत्या झाली,त्याचे संस्कार त्याचा विचार भारत पुढे नेण्याची जबाबदारी आहे, मात्र, अशा पवित्र दिवशी राज्यात आणि देशात सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि तरुण मोठ्या प्रमाणावर आंदोलने करत रस्त्यावर उतरत आहेत. लोकशाही धोक्यात असल्याचे हे अत्यंत चिंताजनक संकेत भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.
सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, मी स्वतः आत्ता ११ वाजता आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेणार आहे. विद्यार्थ्यांच्या या भावना सरकार दरबारी तातडीने मांडल्या पाहिजेत, आज आपल्या मुलांनी शाळा, महाविद्यालये किंवा नोकरीवर असणे अपेक्षित असताना त्यांना परीक्षा आणि हक्कासाठी रस्त्यावर आंदोलने करावी लागत आहेत. हे अतिशय दुर्दैवी असून सरकारने यावर गांभीर्याने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की,राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर,सरकारने सर्वपक्षीय चर्चा केली पाहिजे, ज्याप्रमाणे केंद्रात महत्त्वाच्या आणि राष्ट्रीय विषयांवर ऑल पार्टी मीटिंग बोलावली जाते, तसाच गंभीर विचार राज्य सरकारने दुष्काळाच्या बाबतीत केला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने विधानसभेचे किमान तीन दिवसांचे विशेष चर्चासत्र अथवा अधिवेशन बोलवावे. सर्व आमदारांचा आणि लोकप्रतिनिधींचा फीडबॅक घेऊन शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, कारण ग्रामीण भागातील परिस्थिती अतिशय बिकट असल्याचे सांगितले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कसं आहे भारतीय जनता पार्टीत आमचे काही मित्र आहेत. ते काही तरी नवीन नवीन शब्द काढत असतात. असं काही नसतं. या विद्यार्थ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्यांच्या मेरिटवर न्याय मागत आहेत. २०० आमदार असलेल्या सरकारला मुलांशी चर्चा करायला काय हरकत आहे,एक टप्पा पुढे गेले पाहिजे,लोकशाहीत चर्चा तर झाली पाहिजे,असे त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुणे पोलिसांच्या यंत्रणे मागे जी सत्य आहे त्याबद्दल माझं मत मी कधीच लपवून ठेवलेला नाही, पत्रकारांना मारहाण म्हणून चुकीच आहे,ज्यांनी कुणी कुणाला मारहाण केली ते अयोग्य आहे,पुण्यातील वाढती गुन्हेगारी, कोयता गँगची दहशत आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटना अत्यंत चिंताजनक आहेत, हा डेटा पुन्हा पुन्हा सांगत आहे, हा डेटा माझा नाही. हो मंत्रालयातील डेटा सांगतो,अशा परिस्थितीत महिला अत्याचार सर्वसामान्य जनता ,आज पत्रकारावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळत नाही, यात काही आश्चर्य वाटत नाही, असेही सांगितले.
Marathi e-Batmya