फणसळकर यांच्यासह तीन आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती संचालक पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या

मुंबई : प्रतिनिधी

ठाणे पोलिस आयुक्त व्ही.व्ही.फणसळकर यांना पदोन्नती देत महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार आयपीएस अधिकारी सुरेशकुमार मेखला यांच्याकडे तात्पुरता सुपूर्द करण्यात आला आहे.

अप्पर पोलिस महासंचालक संदीप बिश्णोई यांची लोहमार्ग वरून न्यायिक व तांत्रिक विभागाच्या महासंचालक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. तर के.व्यंकटेशम् यांची अप्पर पोलिस महासंचालक (विशेष कृती अभियान) या पदावरून नागरी संरक्षण विभागाच्या संचालक पदी पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

.

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित वसतिगृहांची संकल्पना जिल्हाधिकाऱ्यांनी १३ ऑक्टोबरपर्यंत सोयीस्कर जागांचे प्रस्ताव पाठवावेत

आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, मराठा तसेच सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहांऐवजी भविष्यात एकाच ठिकाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *