वंचित बहुजन आघाडीकडून १११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर जाती विरहीत समाजासाठी वंचितच्या उमेदवारांना निवडूण देण्याचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी
राज्यात जाती-विरहीत समाजाच्या निर्मितीसाठी एकजातीय आणि कुटुंबशाही असलेल्या राजकारण्यांना निवडूण देवू नये असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले. तसेच या निमित्ताने १११ उमेदवारांची दुसरी यादीही वंचितच्यावतीने प्रसिध्द करण्यात आली.
विधानसभेकरीता वंचित आघाडीकडून डॉक्टर, इंजिनियर्स, प्राध्यापक आदी क्षेत्रातील व्यक्तींबरोबरच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनाही उमेदवारी दिली. तसेच जास्तीत जास्त मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली.

About Editor

Check Also

मनोज जरांगेंच्या मोर्चावरून एकनाथ शिंदे म्हणाले की, कुणीही राजकिय भूमिका घेऊ नये गणेश भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय घेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *