वंचितच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या वाहनावर हल्ला

वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात गाडीच्या समोरील काचा फुटल्या असून उत्कर्षा रूपवते सुखरूप असल्याची माहिती आहे. झाडीतून दगडफेक करत हा हल्ला करण्यात आला. दगडफेकीनंतर हल्लेखोर पळून गेले.

शिर्डी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांचा जोरदार झंझावात सुरू असल्यानेच राजकीय सुडातून हा हल्ला झालं असल्याचे बोलले जाते. प्रस्थापित उमेदवारांना रूपवते यांचा निवडणुकीत धोका वाटत असल्याची चर्चा सुरू आहे.

उत्कर्षा रूपवते यांचे कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन –

रात्री अकोले राजूर ( जिल्हा अहिल्यानगर) येथील प्रचारदौरा संपवून संगमनेरला परत येत असताना माझ्या कारवर दगडफेक झाली. मी सुखरूप असून या क्षणी राजूर पोलीस स्टेशन मध्ये आहे.

कार्यकर्त्यांनी घरीच राहावे. राजूरच्या दिशेने कोणीही येऊ नये. कृपया संयम राखा. आपल्याला निवडणुक तडीस न्यायची आहे.उद्या माझा कोपरगावचा पूर्वनियोजित दौरा ठरल्याप्रमाणे होणार आहे,आपण तिकडे भेटुयात असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

 

About Editor

Check Also

रोहित पवार यांची टीका, भरलेल्या हप्त्याएवढे सुद्धा पैसे परत आले नाहीत पावसाची तूट आणि ७७ हजार कोटींचे नुकसान, शेतकऱ्यांना अद्याप मदत जाहिर नाही

राज्यातील शेतकरी आणि दुष्काळी परिस्थितीवरून आदरणीय शरद पवार साहेब यांनी आमच्यासोबत आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *