अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, बसपा आणि चंद्रशेखर रावण यांना मतदान करू नका उत्तरप्रदेश निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीचा समाजवादी पक्षाला पाठिंबा

मराठी ई-बातम्या टीम  

उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टी आणि त्यांच्या सहयोगी पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. दादर येथील आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली

आरएसएस-बीजेपीचे केंद्रातील सरकार ईडी, इन्कम टॅक्स, आणि सीआयडी सारख्या एजन्सीचा वापर करून विरोधी पक्ष खिळखिळा करू पाहत आहे. बीजेपीला येत्या २०२४ मध्ये स्वतःचा मार्ग मोकळा करून देशाचे संविधान बदलण्याचे राजकारण सुरु करायचे आहे. या पक्षांचा केंद्रात जाण्याचा मार्ग उत्तर प्रदेश मधून जातो. पण आताच्या परिस्थितीमध्ये बसपा किंवा चंद्रशेखर आझाद हे बीजेपीला टक्कर देऊ शकतील असे वाटत नाही. त्यामुळे सध्या समाजवादी पक्ष विरुद्ध आरएसएस अशी परिस्थिती आहे म्हणून असा निर्णय घेतला आहे. आंबेडकरी जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी या निर्णयाला पाठिंबा द्यावा.

आंबेडकरवादी मतदाराचे स्वतंत्र अस्तित्व आहे. एका निवडणुकीमध्ये बायपास दिला तर फरक पडत नाही असे आम्ही मानतो. आपण स्वतःचे अस्तित्व हे निवडणुकीनंतर देखील सुरुवात करता येईल. मानवतावादी, सेक्युलरवादी, आंबेडकरवादी मतदारांनी समाजवादी पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे’ असे आवाहन त्यांनी केले. आरएसएस आणि बीजेपी वगळता इतर कोणत्याही पक्षाशी युती अथवा पाठिंबा देण्यास सहमती असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष पदावर सुनिता गायकवाड यांची नियुक्ती 

वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष पदावर सुनिता गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. सुनिता गायकवाड या घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर कॉलनीच्या रहिवासी आहेत. गेल्या ५ वर्षांपासून त्या पक्षा सोबत काम करत असून विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे.

महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेच्या आगामी निवडणूका लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीने पक्ष विस्तार आणि संघटनात्मक बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आंबेडकर भवन येथे आयोजित बैठकीत पक्षाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीने कामाला लागण्याचे आदेश दिले. तसेच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारे भाषण करत भविष्यातील रणनीतीबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान, सतिश शिंदे यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

About Editor

Check Also

राज्यात नऊ नवीन कारागृहे प्रस्तावित; बंदी क्षमतेत वाढ कैद्यांच्या क्षमतेते १२ हजार २५८ ने वाढ होणार

राज्यात पालघर, अहिल्यानगर, बारामती, येरवडा क्र.०२ व क्र. ०३ जि. पुणे, गोंदिया, हिंगोली, भुसावळ (जि. जळगाव) व अंबाजोगाई (जि. बीड) अशा एकूण नऊ ठिकाणी नवीन मध्यवर्ती व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *