साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची कोरोना विरोधी लढ्याला मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख २१ हजारांचा सहभाग

मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र आज कोरोना विषाणू संसर्गाशी लढत आहे. कोरोना आजारावर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अश्या गंभीर परिस्थितीत प्रत्येकाने प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे असे मत व्यक्त करून अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्धाच्या जयंतीदिनी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, जेष्ठ साहित्यीक आणि हरित वसईचे प्रणेते सन्माननीय फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्कारातील १,२१,००० (एक लाख एकवीस हजार रुपये) रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्य निधी – कोविड 19 साठी वसई तहसीलदारांकडे सुपूर्द केला.
प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे फादर दिब्रिटो यांच्या विनंतीला मान देऊन वसई तहसीलदार किरण सुरवसे यांनी मंडळ अधिकारी कुमार होगडे यांना फादरांच्या घरी पाठवुन या धनादेशाचा स्वीकार केला.

About Editor

Check Also

राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर साहित्य अकादमीतर्फे २०२५चे पुरस्कार जाहिर

साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या  पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील मान्यताप्राप्त २४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *