भिमा कोरेगाव दंगलीतील साक्षीदार पूजा सकट हिची आत्महत्या की हत्या ? सखोल चौकशीची प्रवक्ते महेश तपासे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

भिमा कोरेगाव दंगलीतील मुख्य साक्षीदार असलेल्या पूजा सकट हिचा संशयास्पद मृत्यू झाला असून तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याची सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

भीमा कोरेगाव दंगलीमध्ये ज्या पूजा सकट हिच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. त्या घटनेची पूजा ही मुख्य साक्षीदार होती. या दंगलीमध्ये झालेली जाळपोळ पूजाने डोळयांनी पाहिली होती आणि विशेष म्हणजे पूजा मुख्य आरोपींना ओळखत होती असे असतानाही सरकारने पूजाला आणि तिच्या भावाला पोलिस संरक्षण दिले नव्हते. या प्रकरणात सरकारने पूजाला संरक्षण का दिले नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला मनुवादी विचारांच्या जाळयात कैद करण्याचे हे कट कारस्थान तर नाही, असा संशय निर्माण होत आहे. त्यामुळेच पूजा सकट हिच्या मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशी करावी अशीही मागणी त्यांनी केली.

About Editor

Check Also

महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी रामदास आठवले यांचा सत्कार कोकण रिपब्लिकन संस्थेतर्फे होणार भव्य सत्कार

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९व्या वर्धापन दिनी उद्या २० मार्च …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *