जिग्नेश मेवाणी, कन्हैयाकुमार, हार्दीक पटेल यांच्या उपस्थितीत संविधान बचाव रँली १४ संघटनांच्यावतीने २५ नोव्हेंबरला राजगृहापासून रँली काढणार

मुंबई: प्रतिनिधी

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींना प्रणाम करुन त्यांच्या संविधानाच्या पालखीचे भोई होणार असून देशातील वाढत्या फॅसिझमच्याविरोधात युनायटेड यूथ फ्रंट आणि १४ संघटनाच्या माध्यमातून युवकांचा हा लढा तीव्र करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केले. तसेच या रँलीत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, पाटीदार नेते हार्दीक पटेल आणि जेएनयुच्या विद्यार्थी संघटनेचे नेते कन्हैयाकुमार सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील १४ राजकीय प्रमुख युवा संघटना एकत्र येवून ‘यूनायटेड यूथ फ्रंट’च्या माध्यमातून ही संविधान बचाव रॅली आयोजित करण्यात आली आहे. ही संविधान रॅली २५ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता निघणार आहे. संविधान बचाव रॅली ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहापासून सुरु होवून चैत्यभूमीला समारोप होणार आहे. या रॅलीमध्ये १४ युवा संघटनांसह गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दीक पटेल, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूमधील विदयार्थी संघटनेचे नेते कन्हैयाकुमार उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी युनायटेड युथ फ्रंटची भूमिका सांगितली आणि या फ्रंटला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, काँग्रेसचे मुंबई युवक अध्यक्ष गणेश यादव, राष्ट्रवादीचे मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष रविकांत वरपे, सरचिटणीस सूरज चव्हाण आदींसह समविचारी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर साहित्य अकादमीतर्फे २०२५चे पुरस्कार जाहिर

साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या  पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील मान्यताप्राप्त २४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *