कॉकरोच जनता पार्टीची मोठी अपडेट, तर सोनम वांगचुक उपोषण मागे घेतीलः गीतांजली आंग्मो यांची माहिती जबाबदार निश्चितीचे आश्नासन दिल्यास सोनम वांगचुक उपोषण मागे घेतील

२० जुलै रोजी होणाऱ्या कॉकरोच जनता पक्षाच्या (सीजेपी) प्रस्तावित ‘चलो संसद’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपला जवळपास तीन आठवडे सुरु ठेवलेले उपोषणाचे आंदोलन संपवण्याची तयारी दर्शवली आहे, परंतु त्यासाठी राजकीय नेत्यांनी शिक्षण क्षेत्रातील उत्तरदायित्वाचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचे आश्वासन देणे आवश्यक असल्याची अट सोनम वांगचुक यांनी समोर ठेवल्याची माहिती सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली आंग्मो यांनी आज जंतरमंतर येथील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनस्थळावरून दिली.

ही ऑफर सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांच्यामार्फत आली आहे. आंग्मो यांनी रविवारी सांगितले की, जर राजकीय पक्षांचे नेते त्यांना सफदरजंग रुग्णालयात भेटले आणि सोमवारी सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन दिले, तर ते आपला अनिश्चितकालीन उपोषणाचे आंदोलन मागे घेतील.

जंतर मंतर येथे आंदोलकांना संबोधित करताना गीतांजली आंग्मो म्हणाल्या की, सोनम वांगचुक यांनी सांगितले आहे की, त्यांचा उपवास हे कधीही अंतिम ध्येय नव्हते, तर उत्तरदायित्व मिळवण्याचे एक साधन होते.

पुढे बोलताना गीतांजली आंग्मो म्हणाल्या की, जर राजकीय नेत्यांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात भेटून पावसाळी अधिवेशनादरम्यान शिक्षण उत्तरदायित्वाचा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन दिले, तर ते उद्या आपले उपोषण संपवतील, असे सांगितले.

ही घोषणा कॉकरोच जनता पार्टी- सीजेपीच्या संसदेकडे जाणाऱ्या नियोजित मोर्चाच्या एक दिवस आधी करण्यात आली. कॉकरोच जनता पार्टी- सीजेपी संघटनेच्या म्हणण्यानुसार, परीक्षेतील कथित पेपर फुटी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी आणि भारतातील शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणांसाठी दबाव आणणे हा या मोर्चाचा उद्देश आहे.

दरम्यान, ‘चलो संसद’ हा कार्यक्रम सोमवारी सकाळी ९ वाजता जंतर मंतर येथून सुरू होणार आहे. संसदेकडे जाणाऱ्या मोर्चाच्या आधी रविवारी जंतर मंतर येथे गर्दी वाढली होती.

हा मोर्चा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आयोजित करण्यात आला असून, कथित नीट पेपरफुटी आणि शिक्षण सुधारणांच्या मागण्यांवरून संघटनेने महिनाभर केलेल्या आंदोलनाचा हा समारोप असेल अशी अपेक्षा आहे.

सीजेपीने समर्थकांना मोर्चासाठी नोंदणी करण्याकरिता मिस्ड-कॉल मोहीम सुरू केली आहे. पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी दावा केला आहे की, या उपक्रमाद्वारे १.३ लाखांहून अधिक लोकांनी आधीच नोंदणी केली आहे.

या एकत्रीकरणाचे प्रत्यक्ष जमिनीवरही मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले, कारण देशाच्या विविध भागांतून समर्थक येऊ लागल्याने रविवारी जंतर मंतर हे गर्दीने भरलेले आंदोलनस्थळ बनले.

सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी दावा केला की, नियोजित मोर्चाच्या आधीच जवळपास २०,००० लोक “जंतर मंतरवर आणि त्याच्या आसपास” उपस्थित होते.

एक्स (X) वरील एका पोस्टमध्ये दास यांनी लिहिले, “२०,००० लोक जंतर मंतरवर आणि त्याच्या आसपास आहेत. आणि अजून २० जुलै सुद्धा आलेला नाही. धर्मेंद्र प्रधान – तुमच्या हिशोबाचा दिवस आला आहे.”

पक्षाने सोशल मीडियावर आंदोलनस्थळावरील मोठ्या गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले आणि दावा केला की, सोमवारच्या मोर्चाच्या आधीच देशभरातून समर्थक दिल्लीत पोहोचले होते.

दरम्यान जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली आंग्मो म्हणाल्या, जर राजकीय नेत्यांनी सोनमला रुग्णालयात भेटून संसदेच्या अधिवेशनात शिक्षण उत्तरदायित्वाचा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन दिले, तर सोनम उद्या आपल उपोषणाचे आंदोलन मागे घेतील.

About Editor

Check Also

सफदरजंग रूग्णालयात जबरदरस्तीच्या स्थलांतरानंतर सोनम वांगचुक यांचा पहिला संदेश स्वातंत्र्याचा दुसरा लढा, २० जुलैचा संसदेवरील मोर्चा यशस्वी करा

काल सकाळी इतर कोणाच्या लक्षात येण्याआधीच दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत सामाजित कार्यकर्त्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *